वहिनीवर वाईट नजर, भावाने केला कहर…नात्याला काळीमा फासणारी घटना

Man Killed younger Brother in UP | उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात घडलेल्या एका थरारक हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. एका घरातील कौटुंबिक वाद इतका विकोपाला गेला की, लहान भावाने थेट आपल्या मोठ्या भावाचाच जीव घेतला, कारण काय तर वहिनीवर दिरानेच टाकलेली वाईट नजर, दारूच्या नशेत होणारे गैरवर्तन आणि साठत जाणारा संताप. या संतापाचा शेवट झाला तो एका निघृण खुनात… आणि त्या खुनाचा उलगडा झाला एका सीसीटीव्ही फुटेजमुळे.
काय घडलं त्या दिवशी
९ एप्रिलची सकाळ… चरथावल २ पोलीस ठाण्याच्या हट्टीतील एका झुडपाजवळ काही ग्रामस्थ गेले आणि त्यांची नजर पडली ती एका रक्ताने माखलेल्या मृतदेहावर, मृतदेहाची अवस्था इतकी भीषण होती की, पाहणाऱ्यांच्या अंगावर अक्षरशः काटा आला. डोक्यावर गंभीर मारहाणीच्या खुणा होत्या. कोणीतरी अत्यंत क्रूरपणे हत्या करून मृतदेह झुडपात फेकल्याचे स्पष्ट विसत होते.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला मृताची ओळख पटवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते.
मात्र, मृताच्या हातावर गोंदवलेले एक नाव संपूर्ण प्रकरणाचा पहिला धागा ठरले ‘दीपक’, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि अखेर मृताची ओळख रुकनपूर गावातील दीपकची ओळख पटली. पण प्रश्न होता की दीपकचा जीव कोणी घेतला? आणि का? पोलीस तपास सुरू झाला, पण सुरुवातीला कोणताही ठोस पुरावा मिळत नव्हता. तपास पथकाने घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा निर्णय घेतला. आणि समोर खुनाची सत्यता समोर आली.
सीसीटिव्हीमध्ये काय दिसले?
२८ एप्रिलच्या फुटेजमध्ये दीपक आपल्या लहान भावाला सचिनला बुचाकीवर बसवून नेताना दिसत होता. दोघेही एकत्र निघाले होते. मात्र, काही तासांनंतर परतताना फुटेजमध्ये एक धक्काबायक वृश्य विसले. वुचाकीवर फक्त सचिन एकटाच परतत होता. हा तपशील पोलिसांच्या संशयाला खतपाणी घालणारा ठरला. सचिनला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे देत होता पण पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला.
दीपकचे दारुचे व्यसन आणि भांडण
सचिनने सांगितले की, दीपकला दारूचे जबरदस्त व्यसन होते. तो अनेकदा नशेत घरी येऊन गैरवर्तन करत असे. इतकेच नाही, तर तो आपल्या वहिनीवर म्हणजे सचिनच्या पत्नीवर वाईट नजर टाकत होता. घरातील वातावरण दिवसेंदिवस असह्य होत होते. दारूसाठी पैसे मिळावेत म्हणून दीपक घरची जमीन विकण्याचाही प्रयत्न करत होता. यामुळे सचिनच्या मनात राग, भीती आणि सुडाची आग धुमसत होती.. अखेर या रागाचा शेवट दीपकच्या खुनात झाला.
अशी झाली हत्या
सचिनने दीपकला त्या दिवशी कालव्याजवळ नेले. दीपक मद्यधुंद अवस्थेत होता. संधी साधत सचिनने अचानक वीट उचलली आणि थेट दीपकच्या डोक्यावर प्रहार केला. एक… दोन… तीन… सलग वार करत त्याने मोठ्या भावाचा जागीच खात्मा केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहाकडे पाहूनही त्याचे मन वितळले नाही. उलट पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने मृतदेह जवळच्या झुडपात फेकून दिला आणि जणू काही घडलेच नाही अशा थाटात घरी परतला. पण गुन्हेगार कितीही हुशार असला तरी सत्य कायम लपून राहत नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्याने सचिनचा ‘खुनी प्रवास’ कैद केला होता.
सचिनला अटक
पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपकचे वैवाहिक आयुष्यही उद्ध्वस्त झाले होते. काही वर्षांपूर्वी त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी गेली होती. सध्या पोलिसांनी आरोपी सचिनला अटक केली असून, हत्येसाठी वापरलेली वीटही जप्त करण्यात आली आहे. आरोपीला तुरुंगात पाठवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
Source link



