Uncategorized

वनविभागाचे पंचनाम्यास विलंब अन् सुटला शेतकऱ्याच्या अश्रूंचा बांध

शाहुवाडी प्रतिनिधी

शाहूवाडी तालुक्यातील टेकोली येथील जालिंदर पाटील यांच्या शेतातील मका वन प्राण्यांनी खाऊन नुकसान केले आहे . याबाबत वन विभागाने पंचनामा करण्यास विलंब केल्याप्रकरणी जालिंदर पाटील यांनी नुकसानग्रस्त मकाच आणून वन विभागाच्या दारात टाकला आणि आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या . यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते .दरम्यान तात्काळ वनरक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला .
वन्यप्राण्यांनी केले नुकसान

टेकोली येथील जालिंदर पाटील यांचा दोन-तीन दिवसांपूर्वी मका वन्य प्राण्यांनी फस्त केला आहे .सदर नुकसानीचा तात्काळ पंचनामा करावा यासाठी त्यांनी वन विभागात संपर्क साधला होता . मात्र तीन चार दिवस झाले तरी पंचनामा न केल्याने ते चांगलेच आक्रमक झाले . गेले अनेक दिवस टेकोली परिसरात वन प्राण्याकडून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होत आहे . त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत . मुळातच कष्ट करून पिकवलेले आणि हाता तोंडाशी आलेल्या पीक वन्य प्राणी खाऊन टाकल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले आहे . होऊ लागले आहे .

 

पंचनाम्यास विलंब   

दरम्यान आपल्या नुकसानग्रस्त शेतीचा पंचनामा करण्यास वन विभागा कडून विलंब होत असल्याच्या नैराश्यपोटी जालिंदर पाटील यांनी नुकसानग्रस्त मकाच आणून वनविभागाच्या दारात टाकला . घटनेच गांभीर्य कळताच वनरक्षक यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत विलंब होण्यामागचं कारण स्पष्ट केलं .मात्र तरी देखील आक्रमक झालेले जालिंदर पाटील हे आपल्या भूमिकेशी ठाम होते .यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या . अखेर प्रत्यक्ष शेतात जाऊन वनरक्षक गुरुबच्यन हिप्परकर यांनी पंचनामा केला .
फोटो
शाहुवाडी वन विभागाच्या दारात आक्रमकपणे आपली भावना


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​