Uncategorized

रामतीर्थनगर येथे 5 लाखाची घरफोडी

ठेकेदाराचे बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड लंपास

त. भा. प्रतिनिधी

बेळगाव : ठेकेदाराचे बंद घर फोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम अशा एकूण 4 लाख 97 हजार 500 रुपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारून पलायन केले आहे. सदर घटना रविवार दि. 6 रोजी रामतीर्थनगर येथे उघडकीस आली असून याप्रकरणी परशराम रामाप्पा पम्मार रा. रामतीर्थनगर यांनी माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत तपास चालविला आहे.

फिर्यादी परशराम पम्मार हे ठेकेदार असून ते 31 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 च्या सुमारास आपल्या घराला कुलूप घालून रामदुर्गला गेले होते. चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत त्यांच्या घराच्या मागील दरवाजाचा आतील कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरुममधील बेडच्या खाली ठेवलेली चावी घेऊन ट्रेझरीचे दरवाजेही उघडले. ट्रेझरीमधील 4 लाख 41 हजार 500 रुपये किमतीचे चांदीचे दागिने, 6 हजार किमतीचे सोन्याचे दागिने आणि 50 हजार रुपयांची रोकड अशा एकूण 4 लाख 97 हजार 500 रुपये किमतीच्या ऐवजावर डल्ला मारून पलायन केले.  फिर्यादी रविवार दि. 6 रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास रामदुर्गहून रामतीर्थनगर येथील घराकडे परतल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. त्यानंतर त्यांनी ही माहिती माळमारुती पोलिसांना दिली. माळमारुती पोलीस स्थानकाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

गेल्या काही दिवसांपासून माळमारुती पोलीस स्थानकाच्या हद्दीत वारंवार घडफोडीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावेत. त्याचबरोबर रात्रीची गस्त वाढविण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​