दोडामार्ग तालुक्यात कोकणच्या गणेशोत्सवात माणुसकीचा गोडवा; विशाल परब यांच्या पुढाकारातून गणेशभक्तांना पूजा साहित्याचे वाटप

दोडामार्ग / प्रतिनिधी : कोकणातील गणेशोत्सव म्हणजे श्रद्धा, संस्कृती, परंपरा आणि आपुलकीचा अनोखा संगम. प्रत्येक कुटुंबाला गणेशोत्सवाचा आनंद उत्साहात आणि समाधानाने साजरा करता यावा, या भावनेतून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकारातून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील गणेशभक्तांना पूजा साहित्याचे वाटप करण्यात येत आहे.
या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात दोडामार्ग तालुक्यातील भाजपा पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख आणि बूथ अध्यक्षांकडे गणेशपूजा साहित्य सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर हे साहित्य तालुक्यातील गणेशभक्तांच्या घरोघरी पोहोचविण्यात येणार आहे.
भाजपा जनसंपर्क कार्यालय, सावंतवाडी येथे या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. विशाल परब यांच्या हस्ते उपस्थित पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख आणि बूथ अध्यक्षांकडे पूजा साहित्य सुपूर्द करण्यात आले. हे साहित्य गणेशभक्तांच्या घरोघरी सन्मानपूर्वक पोहोचवून त्यांच्या गणेशोत्सवाच्या आनंदात सहभागी व्हावे, असे आवाहन विशाल परब यांनी कार्यकर्त्यांना केले.
यावेळी विशाल परब यांच्यासह रंगनाथ गवस, शिरीष नाईक तसेच तालुक्यातील शक्ती केंद्रप्रमुख महेश लोंढे, सूर्याजी झेंडे, सुरेंद्र संभाजी सावंत, प्रकाश गवस आणि संतोष आईर उपस्थित होते.
कार्यक्रमाला उसप बूथ अध्यक्ष नीलेश नाईक, नवनाथ साळिकर, विनायक सावंत, शंकर परब, किशोर शेट्ये, उत्तम दळवी, विठ्ठल गवस, वृषभ देसाई, ज्ञानेश्वर आईर, मंगेश नाटेकर, रमेश ठाकूर, चंद्रहास राऊळ, विजय चंद्रकांत ठाकूर, कल्पेश गवस, प्रवीण गवस, यशवंत कुबल, ओंकार रेडकर आणि बूथ अध्यक्ष विशाल चव्हाण यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Source link



