राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत साहिश तळणकरचा ‘सुवर्णवेध’

एसपीके महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या यशाचे कौतुक
न्हावेली /वार्ताहर
एनसीसी संचलनालय महाराष्ट्र राज्यातर्फे आयोजित इंटर ग्रुप साहिश तळणकर शूटिंग चॅम्पियनशिप २०२६ राज्यस्तरीय स्पर्धेत येथील एसपीके कॉलेजचा एनसीसी कॅडेट साहिश तळणकर याने सुवर्णपदक पटकावले.साहिश हा मूळ कुडासे (ता. दोडामार्ग) येथील असून तो श्री पंचम खेमराज कॉलेजमध्ये प्रथम वर्ष बीएससीमध्ये शिकत आहे.राज्यस्तरीय शूटिंग स्पर्धा नुकतीच छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल,कोल्हापूर येथे पार पडली.या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून स्पर्धकांनी सहभाग घेतला. साहिश हा एनसीसीच्या राज्यस्तरीय कॅम्पमध्यै सहभागी झाला होता. त्याची शूटिंगची आवड लक्षात घेता त्याची निवड या स्पर्धेसाठी झाली होती. आपली निवड सार्थ ठरवत त्याने या स्पर्धेमध्ये श्री पोझिशन ५० मीटर रायफल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदकावर नाव कोरले.साहिश हा येथील उपरकर शुटिंग ॲकॅडमीमध्ये सराव करतो. त्याला प्रशिक्षक कांचन उपरकर (सावंतवाडी) व इंद्रजित मोहिते (कोल्हापूर) यांचे मार्गदर्शन लाभले, त्याची १९ जुलै तै ३ ऑगस्ट दरम्यान तिरुचिलापल्ली, केरळ येथे होणाऱ्या पूर्व राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Source link



