Uncategorized

माणूस गिळल्याने मगरीला अटक

ही घटना दक्षिण आफ्रिका या देशातील आहे. या देशातील एक प्रसिद्ध उद्योगपती गॅब्रिअॅल बॅटिस्टा हे काही दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्यांचा शोध घेण्यास प्रारंभ करण्यात आला. आठ दिवस शोध घेतल्यानंतर असे आढळले की त्यांची कार एका नदीच्या पात्रात अडकली आहे. कार बाहेर काढण्यात आली. पण त्यात त्यांचा मृतदेह आढळून आला नाही. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले. या नदीत मगरींचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना कदाचित मगरीने गिळले असावे असा संशय निर्माण झाला. त्यामुळे त्या दिशेने तपासकार्य करण्यात आले.

हेलिकॉप्टरमधून आकाशातून या नदीपात्रातील मगरींचे निरीक्षण करण्यात आले. त्यावेळी एक मगर अत्यंत विपरीत परिस्थितीत सुस्त पडलेली आढळून आली. मगरीचे पोट प्रमाणाबाहेर फुगले होते आणि ती एकाच जाग बराच काळ निपचित पडल्याप्रमाणे हालचाल न करता राहिली होती. त्यामुळे तिने बॅटिस्टा यांना गिळले असावे, अशी शक्यता दिसू लागली. मगरीने खरोखरच बॅटिस्टा यांना गिळले आहे काय, याचा शोध घेण्यासाठी तिला ताब्यात घेण्याची आवश्यकता होती. पण हे कार्य अत्यंत अवघड आणि मोठ्या प्रमाणात धोकादायक होते. अखेरीस मगरीला प्रथम डार्ट मारुन (बेशुद्ध करणारी गोळी मारुन) नियंत्रणात आणण्यात आले. नंतर तिचे पाय बांधून तिला हेलिकॉप्टरने उचलण्यात आले आणि रीतसर ‘अटक’ करण्यात आली. नंतर तिला कूगर राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले. तेथील वन्य प्राणी रुग्णालयात तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तिच्या पोटात मानवी अवषेश आढळून आल्याने संशय वाढला आहे. आता या मानवी अवषेशांचे डीएनए परीक्षण केले जाणार आहे. त्यातून हे अवषेश बॅटिस्टा यांचेच आहेत की नाहीत हे समजणार आहे. या कामासाठी काही वेळ लागणार असल्याने मधल्या काळात बॅटिस्टा यांचा शोध घेण्याचे कार्य पोलिसांकडून  पुढे चालविले जात आहे.

या घटनेची माहिती सोशल मिडियावरुन प्रसिद्ध झाल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. बॅटिस्टा यांची कार नदीत अडकली कशी, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. पण प्रथम मगरीच्या पोटात सापडलेले मानवी अवषेश त्यांचेच आहेत काय, या महत्वाच्या प्रश्नाची उकल केली जाईल, असे स्पष्ट केले गेले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​