Uncategorized

बेतोडा जमीन हडप रॅकेटचा पर्दाफाश

फोंडा येथील मध्यस्थ फर्दिन शेख गजाआड : उपनगरनियोजकाची अटकपूर्व जामिनासाठी धाव

फोंडा : बनावट ना हरकत दाखल्यांचा वापर करून पाडलवाडा-बेतोडा येथे हडप केलेल्या जमिनीत 50 हून अधिक भूखंडांची विक्री केल्याप्रकरणी फर्दिन शेख (रा. फोंडा नगरपालिकेजवळ) या मध्यस्थाला फोंडा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित मोहम्मद जावेद मुल्ला (रा. नागामशिद, कुर्टी) व निरज काणकोणकर (रा. काणकोण) यांच्यावर यापूर्वीच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही मुख्य संशयितांसह नगरनियोजन खात्याचे फोंड्यातील तत्कालीन उप नगरनियोजक मांगिरीश वेर्णेकर यांनी याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केले आहेत.

बेतोडा येथील सर्व्हे क्रमांक 215/0 मधील साधारण 55,700 चौ. मीटर जमीन बेकायदेशिररित्या हडप केल्याची तक्रार उच्चारी गावडे या स्थानिकाने नोंदवली होती. विक्री केलेल्या जमिनीपैकी साधारण 10 हजार चौ. मीटर जागा बागायती (ऑर्चिड) असून उर्वरित पूर्वापार शेतजमीन म्हणून नोंद आहे. त्यामुळे या जमिनीचे रूपांतर सहसा होऊ शकत नाही. मात्र काही लोकांना हाताशी धरून बेकायदेशीर कागदपत्रे आणि बनावट ना हरकत दाखल्यांचा वापर कऊन या जमिनीत सत्तरहून अधिक भूखंड पाडण्यात आले आहेत. त्यासाठी शंभरहून अधिक काजूची व अन्य झाडांची कत्तल करण्यात आली आहे.

ही जमीन कोमुनिदाद म्हणून नोंद असली तरी त्यात भागिदार म्हणून 11 लोकांची नावे एक चौदाच्या उताऱ्यात लागली आहेत. हडप केली 55,700 चौ. मी. जमीन बेकायदेशीर हडप करण्यात आलेल्या या सर्व्हे क्रमांकामध्ये साधारण 18 लाख चौरस मीटर जमीन असून त्यापैकी 55,700 च्या जागेतील भूखंड विकल्यानंतर उर्वरित जागाही हडपण्याच्या हालचाली सुऊ होत्या. या जमिनीच्या बाजूला खासगी वनक्षेत्र आहे. जेथे गवेरेडे व अन्य वन्यप्राण्यांचा संचार असून रस्त्याच्या बाजूलाच वन खात्याने गव्यारेड्यांचा वावरक्षेत्र असल्याचा फलकही लावलेला आहे. हा संपूर्ण परिसर भूखंडात ऊपांतरीत झाल्यास येथील वन्यप्राण्यांचा अधिवास आणि संचार धोक्यात येणार असल्याचे तक्रारदार उच्चारी गावडे यांनी सांगितले.

बनावट ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’चा केला वापर

अकरापैकी पाच जणांच्या पॉवर ऑफ ॲटर्नीचा वापर करुन २०२३ मध्ये ना हरकत दाखले घेण्यात आले आहेत, जे मुळात बनावट आहेत. उर्वरित सहा जणांना या व्यवहारातून वगळण्यात आले आहे.

आतापर्यंत तब्बल ५० हून अधिक भूखंडांची विक्री

२०२४ पासून या भूखंडांचे विक्री खत सुरु असून आतापर्यंत पन्नासहून अधिक भूखंड विकण्यात आले आहेत. या सर्व लोकांची मोठी फसवणूक झाली आहे.

डॉक्टर्स, शिक्षक,पोलिसांनी घेतले भूखंड

डॉक्टर्स, निवृत्त शिक्षक, निवृत्त पोलीस यासह अन्य लोकांनी हे भूखंड खरेदी केले आहेत. याशिवाय अजून काही लोकांनी भूखंड खरेदीसाठी आगाऊ पैसेही दिल्याने या सर्व लोकांचीही फसवणूक झाली आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​