Uncategorized

पोर्तुगालच्या धडाक्यापुढे उझबेकिस्तान गारद

उझबेकवर 5-0 गोल्सनी दणदणीत विजय, विक्रमवीर रोनाल्डोचे पुनरागमन

वृत्तसंस्था, ह्युस्टन : आपल्या सहाव्या विश्वचषकाच्या सुऊवातीला निराशाजनक कामगिरी केल्यानंतर क्रिस्तियानो रोनाल्डोने जोरदार पुनरागमन केले. त्याने पोर्तुगालला उझबेकिस्तानविऊद्ध 5-0 असा एकतर्फी विजय मिळवून दिला, ज्यामुळे हा संघ पुन्हा एकदा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे संकेत मिळाले आहेत. काँगोविऊद्धचा पहिला सामना 1-1 असा बरोबरीत सुटल्याने निर्माण झालेली निराशा मागे सारत रोनाल्डोने या लढतीत दोन गोल केले.

‘गट के’मध्ये पोर्तुगालचे चार गुण झाले आहेत. काँगोविऊद्धच्या निराशाजनक कामगिरीनंतर रोनाल्डोला सुऊवातीच्या संघात ठेवावे की नाही, यावर काही समीक्षकांनी प्रश्न उपस्थित केले होते. मात्र प्रशिक्षक रॉबर्टो मार्टिनेझ यांनी या सुपरस्टारवर विश्वास कायम ठेवला आणि त्यांचा हा निर्णय त्वरित फलदायी ठरला. रोनाल्डोने सहाव्या मिनिटाला गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. रोनाल्डोने आपल्या उजव्या पायाने जुआंव कॅन्सेलोचा ‘क्रॉस’ जाळीत रवाना केला आणि इतिहासात आपले नाव कोरले.

39 व्या मिनिटाला रोनाल्डोने आणखी एक गोल केला. ब्रुनो फर्नांडिसकडून मिळालेला पास त्याने उजव्या पायाने अगदी जवळून जाळीत मारला आणि संघाची आघाडी 3-0 अशी केली. त्याआधी 17 व्या मिनिटाला नुनो मेंडीसने ’फ्री-किक’वर गोल करून संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. 60 व्या मिनिटाला प्रतिस्पर्धी संघाकडून झालेल्या स्वयंगोलमुळे पोर्तुगालची आघाडी 4-0 अशी झाली. 83 व्या मिनिटाला मैदानात आलेल्या राफेल लिओने 87 व्या मिनिटाला गोल करत ही आघाडी 5-0 पर्यंत वाढवली.

30 व्या मिनिटाला उझबेकिस्तानचा मिडफील्डर अझीझजॉन गनीव याने गोल केल्याचे वाटले होते, परंतु ‘व्हिडिओ रिह्यू’मध्ये असे दिसून आले की, त्याच्या अगदी आधी अब्बोसबेक फायझुल्लाएव्हने जुआंव कॅन्सेलोच्या बाबतीत ‘फाऊल’ केले होते. त्यामुळे तो गोल रद्द करण्यात आला. सामन्याच्या चौथ्या मिनिटाला रोनाल्डोसमोर गोल करण्याची उत्तम संधी होती. त्याने मेंडीसचा ‘क्रॉस’ स्वीकारून उजव्या पायाने मारलेला फटका थोडक्यात हुकला. दुसऱ्या सत्रातील ‘इंज्युरी टाइम’च्या शेवटी त्याला हॅट्ट्रिक करण्याची संधी मिळाली होती, परंतु त्याचा फटका थोडक्यात चुकला.

उझबेकिस्तानचा संघ आता अटलांटा येथे काँगोविऊद्ध खेळणार आहे, तर गटातील पहिले स्थान ठरवण्यासाठी पोर्तुगालचा सामना फ्लोरिडातील मियामी गार्डन्स येथे कोलंबियाविऊद्ध होणार आहे.

रोनाल्डोच्या गौरवशाली कारकिर्दीत आणखी एक भर

41 वर्षीय रोनाल्डो सहा वेगवेगळ्या विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल करणारा पहिला खेळाडू ठरला असून त्याला नंतर सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे विश्वचषकात गोल करणारा तो दुसरा सर्वांत वयस्कर खेळाडू ठरला आहे. त्याच्या पुढे कॅमेरूनचा आघाडीपटू रॉजर मिला आहे, ज्याने 1994 मध्ये अमेरिकेत झालेल्या स्पर्धेत गोल केला तेव्हा त्याचे वय 42 वर्षे होते. यावर्षी रोनाल्डो आणि अर्जेंटिनाचा कर्णधार मेस्सी हे सहा विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळलेले इतिहासातील दोनच पुऊष खेळाडू ठरले आहेत.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​