Uncategorized

‘तरुण भारत’च्या ‘विठू माऊली’ अंकातून पालख्यांचे दस्तऐवजीकरण

ह. भ. प. चैतन्य महाराज कबीर यांचे कौतुकोद्गार : मुरलीधर मोहोळ, मेधा कुलकर्णींसह मान्यवरांच्या उपस्थितीत विशेषांकाचे प्रकाशन

 त. भा. प्रतिनिधी

पुणे : 

संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुणे मुक्कामी असणे हा पुण्य पर्वकाळ आहे. अशा वेळी ‘तरुण भारत’च्या ‘विठू माऊली’ अंकाचे प्रकाशन होणे औचित्यपूर्णच म्हणता येईल. या पालखी विशेषांकातून ‘तरुण भारत’ने पालख्यांच्या इतिहासाचे अभ्यासपूर्ण संकलन अर्थात दस्तऐवजीकरण केले असल्याचे कौतुकोद्गार संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त ह.भ.प. चैतन्य महाराज कबीर यांनी शुक्रवारी येथे केले.

‘तरुण भारत’च्या ‘विठू माऊली’ विशेषांकाचे प्रकाशन केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह पुण्याच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि संतसाहित्याचे अभ्यासक उल्हास पवार, ‘तरुण भारत’चे समूह प्रमुख-सल्लागार संपादक व ‘लोकमान्य’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर, ‘पुणे पुस्तक महोत्सवा’चे संयोजक राजेश पांडे, ‘फेसबुक दिंडी’चे स्वप्नील मोरे, ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी’चे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव, ‘तरुण भारत’चे विभागीय संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड, जाहिरात विभागाचे ‘नॅशनल हेड’ संजय ननावरे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी ते बोलत होते.  चैतन्य महाराज म्हणाले, संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या पालख्या दोन दिवस पुणे मुक्कामी आहेत. हा पुण्यपर्वकाळ आहे. त्याचे औचित्य साधत महाराष्ट्रातील पालख्यांची परंपरा, त्यांचा इतिहास संकलित करण्याचा ‘तरुण भारत’चा हा उपक्रम स्तुत्य आहे. संत ज्ञानेश्वर कमिटीच्या वतीने मी याबद्दल ‘तरुण भारत’चे अभिनंदन करतो.

डॉ. श्रीरंग गायकवाड म्हणाले, ‘पालखी हा समतेचा आणि बंधुभावाचा सोहळा आहे. संत हे तर आद्य पत्रकार. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आजची पत्रकारिता सुरू आहे. महाराष्ट्र धर्म संतांनी सर्वप्रथम सांगितला. ज्ञानोबा-तुकोबा या दोन नावातच सर्व संत आले. या दोन नावात सर्व संतांची नावे अनुस्यूत आहेत. संतांचे विचार पुढे नेत काजव्याची भूमिका ‘तऊण भारत’ पार पाडत आहे.’

 अभंग मैफलीने सोहळ्यात आनंदाचे तरंग

‘विठू माऊली’ विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यात वि. मंजुषा कुलकर्णी-पाटील व पं. आनंट भाटे यांच्या अभंग गायनाने मैफलीत आनंदाचे रंग भरले. ‘अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र’ने मंजुषा कुलकर्णी-पाटील यांनी सांगीतिक मैफलीला सुऊवात केली. ‘जय जय रामकृष्ण हरी’चा गजर करीत त्यांनी भक्तियोग साधला. ‘अवघाची संसार सुखाची करीन । आनंदे भरीन । तिन्ही लोका ।।’ या अभंगातून त्यांनी आनंदाची पेरणी केली. ‘झाले समाधान, तुमचे देखिले चरण…’या तुकोबारायांच्या अभंगातून मैफलीने वेगळी उंची गाठली. ‘श्रीरंगा कमलाकांता’तून भक्ताची आर्त हाक प्रकटली. तर ‘जोहार मायबाप’मधून अर्पण भाव प्रतित झाला.

पं आनंद भाटे यांनी ‘इंद्रायणी काठी देवाची आळंदी’ या अभंगातून भक्तीचा प्रवाह पुढे नेला. ‘बोलू ऐसे बोले, जेणे बोले विठ्ठल बोले,’ या अभंगातून विठुरायाच्या वास, सहवासाचीच उपस्थितांना अनुभूती मिळाली. ‘ज्ञानियांचा राजा’ या  अभंगातील प्रत्येक शब्द अन् त्याला मिळालेल्या स्वरसाजातून जणू ज्ञानदेवांचेच दर्शन घडले. ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ या अभंगाने कळसाध्याय गाठला. भैरवीने मैफलीचा समारोप झाला. प्रशांत पांडव, शुभम उगले, अपूर्व द्रविड, माधव लिमये यांनी साथसंगत केली.

डॉ. किरण ठाकुर यांच्याकडून मान्यवरांचा सन्मान

‘तरुण भारत’चे समूह प्रमुख-सल्लागार संपादक व ‘लोकमान्य’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांच्याकडून मुरलीधर मोहोळ, प्रा. मेधा कुलकर्णी, उल्हास पवार, राजेश पांडे, ह. भ. प. चैतन्य महाराज कबीर, ह. भ. प. त्रिगुण महाराज गोसावी यांच्यासह अन्य मान्यवरांचा या वेळी सन्मान करण्यात आला.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​