Uncategorized

ढोलगरवाडी फाटा बनतोय अपघातांचे केंद्र

वार्ताहर, कागल

बेळगाव-बेंगळूर महामार्गावरील ढोलगरवाडी फाटा हा परिसर झपाट्याने विकसित होत असून, वाढत्या वाहतुकीमुळे हा फाटा अपघातप्रवण रस्ता ठरत आहे. रोजच्या वाढलेल्या या ठिकाणी छोटे-मोठे अपघात घडण्याने स्थानिक नागरिक व वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या फाट्यावर बेळगावच्या दिशेने येणारी वाहने भरधाव वेगाने येत असल्याने चालकांना वेगावर नियंत्रण ठेवणे अवघड जात आहे. दुसरीकडे, मोजे कागल गावाकडून मुख्य रस्त्यावर येताना फाट्याजवळ थोडा वळण असल्याने तेथील वाहनांच्या वाहतुकीचा अचूक अंदाज येत नाही. परिणामी, मुख्य मार्गावर धावणारी वाहने आडवी जात असून त्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत.

सुदैवाने आतापर्यंत मोठी जीवितहानी टळली असली, तरी भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने या फाट्यावर आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​