डॉ. सेजल पवारला मोठा झटका!

मुंबई -कॉमेडियन प्रणित मोरे याच्या कॉमेडी-शो दरम्यान मृतदेहाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं डॉ. सेजल पवार हिला चांगलेच महागात पडल्याचे दिसत आहे.. डॉ.सेजल हिला पंधरा दिवस सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय के.ई.एम. प्रशासनानं घेतला आहे. या 15 दिवसांच्या दरम्यान सेजल पवारला कॉलेजमध्ये येण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. आज सेजल पवारच्या पालकांशी वरिष्ठांनी चर्चा केली असून त्यानंतर सेजल पवारला त्यांच्या ताब्यात सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
काय आहे प्रकरण
सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज संलग्न केईएम रुग्णालयातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी सेजल पवार हिने प्रणित मोरे याच्या स्टॅंडअप कॉमेडी कार्यक्रमादरम्यान थेट मृतदेहा संदर्भात आक्षेपार्ह विधान केले होते. तिने केलेल्या विधानाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाल्यावर सोशल मिडीयावर संतप्त प्रतिक्रीया उमटत आहे…
एक डॉक्टर असुन ही अशी कशी वक्तव्य करु शकते , हीच्यावर लवकरात लवकर कारवाई करा अशी मागणी नागरिकांमधुन होत आहे.. या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या समितीने संबंधित कॉमेडी शोचं संपूर्ण रेकॉर्डिंग बघितले. सेजल पवार हिच्या अडचणीत मोठी वाढ झाली… डॉक्टर सेजल पवार हिने व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर थेट एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून या प्रकरणात माफीही मागितली.15 दिवसांच्या दरम्यान सेजल पवारला कॉलेजमध्ये येण्यापासून मज्जाव करण्यात आला असुन येणाऱ्या काळात तीच्यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागुन राहीले आहे.
Source link



