चौके – मालवण रस्त्याने घेतला मोकळा श्वास

माजी सरपंच राजा गावडेंच्या नेतुत्वाखाली स्वच्छता मोहिम
चौके/ प्रतिनिधी
चौके ते मालवण पर्यत जाणार्या रस्त्यावर चौके गावचे माजी सरपंच राजा गावडे यांच्या नेतुत्वाखाली नुकतीच स्वच्छता मोहीम हाती घेऊन एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला . दोन ट्रॅक्टर कचरा एकत्र करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. या स्वच्छता मोहीमेमुळे चौके ते मालवण या रस्त्याने कचर्यापासून मोकळा श्वास घेतला. या मोहिमेबद्दल चौके पंचक्रोशीमधुन माजी सरपंच राजा गावडे व जिल्हा शिवसेना उपाध्यक्ष राजा गावडे यांचे आभार मानण्यात आले आहेत.चौकै व मालवण आठवडा बाजारासाठी येणारे व्यापारी विशेष करुन भाजी व्यापाऱ्यांनी सर्व कचरा चौके ते मालवण दरम्यान रस्त्याच्या बाजुला टाकून रस्त्याच्या दोन्ही बाजूला कचर्याचे साम्राज्य निर्माण करतात .पिशव्या प्लास्टिक कागद आदी कचर्यामुळे या रस्त्यावरून ये जा करणार्या वाहन चालकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असे.तसेच या ठिकाणी टाकलेल्या कचरा गावातील गुरे खात होती त्यामुळे गुरांमध्ये रोगराई पसरण्याची शक्यता होती.तसेच या कचऱ्याच्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर होता.त्यामुळे या ठिकाणी वावरणार्या कुत्र्यांनी वाहनधारकांना चावा घेतला होता.या कुत्र्यांमुळे या ठिकाणी अपघात घडलेले आहेत.या साफसफाई मोहिमेमध्ये राजा गावडे यांच्या नेतुत्वाखाली सामाजिक कार्यकर्ते दादा नाईक , गोट्या गावडे,गुरू सुकाळी,साई गावडे,वाहतुक पोलिस श्री.देऊलकर,वरुण गावडे आदी सहभागी झाले होते .
Source link


