Uncategorized

चाकरमान्यांसाठी ‘मोदी एक्स्प्रेस’च्या तारखेत बदल; आता 11 आणि 13 सप्टेंबरला दादरहून कोकणासाठी विशेष रेल्वे

कणकवली : गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या आग्रहाचा मान राखत ‘मोदी एक्स्प्रेस’च्या प्रवासाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. यापूर्वी 9 आणि 11 सप्टेंबर रोजी सोडण्यात येणारी ही विशेष रेल्वे आता 11 आणि 13 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता दादर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वरून कोकणाच्या दिशेने रवाना होणार आहे.

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी याबाबत माहिती दिली. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी दरवर्षी विशेष ‘मोदी एक्स्प्रेस’ची व्यवस्था करण्यात येते. यंदाही मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होणार असल्याने त्यांच्या प्रवासाची सोय करण्यासाठी या विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे.

यापूर्वी 9 आणि 11 सप्टेंबर या तारखांना ‘मोदी एक्स्प्रेस’ सोडण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, या तारखांमध्ये बदल करण्याची मागणी चाकरमान्यांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आता 11 आणि 13 सप्टेंबर रोजी विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गणेशभक्तांनी नाचत-गात, भजनांच्या गजरात आणि उत्साहाच्या वातावरणात कोकणात पोहोचावे, या उद्देशाने ‘मोदी एक्स्प्रेस’ची व्यवस्था करण्यात आली आहे. या रेल्वेसेवेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांनी भारतीय जनता पक्षाच्या संबंधित मंडळ अध्यक्षांशी संपर्क साधून तिकिटांचे बुकिंग लवकरात लवकर करून घ्यावे, असे आवाहन नीतेश राणे यांनी केले आहे.

तारखांमध्ये करण्यात आलेल्या या बदलामुळे मुंबई आणि परिसरातून गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​