Uncategorized

खजाना भविष्य

दि. 12 ते 18 ऑगस्ट 2026

मेष

लहान भावंडांबरोबर थोडे मतभेद  होण्याचा संभव आहे. पण मोठ्या भावंडाच्या मध्यस्थीमुळे मतभेद विकोपाला जाणार नाहीत. सामंजस्याने प्रश्न सुटतील. मातेचा सहवास, तिचा आशीर्वाद पुरेपूर लाभेल. या सर्वांमुळे कौटुंबिक समाधान लाभेल. पण उद्योगात म्हणावा तसा लाभ मिळणार नाही. नोकरीच्या ठिकाणी आपल्या वाणीवर संयम ठेवा.

उपाय: रोज सूर्याला अर्ध्य द्या.

वृषभ

या आठवड्यात आपल्या कामाच्या ठिकाणी आपले लक्ष विशेष केंद्रित होईल. त्यामुळे आपले काम व्यवस्थित होईल आणि त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढेल. आपले वरिष्ठ आपल्यावर खूष होतील. आपल्याला बढती मिळण्याची शक्यता आहे. या सर्वांमुळे स्वत:चा अभिमान वाटेल. पण तो अभिमान गर्वात बदलेल, असे करू नका.

उपाय: सद्गुरुंची उपासना करा.

मिथुन

आपल्या कुटुंबासोबत छान वेळ घालवाल. पण कुटुंबीयांसोबत दादागिरी करायला जाऊ नका. चुकून चेष्टा मस्करी करता करता कुणाचे मन तर दुखावले जात नाही ना याकडे लक्ष द्या. नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी मात्र कष्ट खूप घ्यावे लागतील. कष्टाचे फळ मिळेल. पण कष्ट प्रामाणिक हवेत तरच चांगले फळ मिळेल.

उपाय: मंगळवारी हनुमान चालिसा म्हणा.

कर्क

खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. अत्यंत गरज असेल तर तिथेच खर्च करा. अन्यथा अपव्यय होईल. या आठवड्यात आत्मविश्वास वाढल्याचे तुमचे तुम्हालाच जाणवेल. आपल्या बुद्धीचा योग्य प्रकारे उपयोग करून आपले कार्यक्षेत्र वाढवाल. विशेष करून ज्यांचा दैनंदिन व्यवसाय आहे त्यांच्या बाबतीत ही शक्यता जास्त आहे.

उपाय: श्री गणेशाचे संकटनाशन स्तोत्र म्हणा.

सिंह

परदेश प्रवास होण्याची शक्यता आहे. अथवा परदेशातून व्यापारात लाभ होण्याची शक्यता आहे. पण कोणती तरी सतत चिंता मनाला लागून राहील. जोडीदाराबरोबर थोडे संयमाने घ्या. उगाच वादावादी करू नका. पैत्रुक संपत्तीची आशा सध्या करू नका. त्यासाठी प्रयत्नही करू नका. नातेसंबंध बिघडतील. मुलांच्याकडे लक्ष द्या.

उपाय: श्री गणपती अथर्वशीर्ष म्हणा.

कन्या

आळस झटकून कामाला लागलात तर कष्टाचे फळ नक्की मिळते. मोठ्या भावंडांचा सहवास मिळण्याची शक्यता आहे. काही सभा समारंभात जायचा योग येईल. काही मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील आणि या गाठीभेटीतून आपल्या फायद्याचेच काहीतरी निष्पन्न होईल. आलेल्या संधीचा फायदा घ्या.

उपाय: सूर्याला अर्ध्य द्या.

तुळ

मुलांच्याकडे लक्ष द्या. ती कुठे चुकीच्या प्रलोभनाला बळी तर पडत नाहीत ना इकडे लक्ष द्या. लहान भावंडांच्या बरोबर छोट्या छोट्या कुरबुरी होण्याची शक्यता आहे किंवा शेजाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. पण या कुरबुरी, मतभेद टोकाला नेऊ नका. संयमाने घ्या. या आठवड्यात कोणत्या तरी आध्यात्मिक वातावरणात रमाल.

उपाय: सोमवारी महादेवाला बेल वाहा.

वृश्चिक

कुठेतरी तीर्थक्षेत्री प्रवास होण्याची शक्यता आहे. संतांचा सहवास मिळेल. त्यांचे आशीर्वाद मिळतील. पण तब्येतीच्या किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.  तब्येतीला सांभाळा. मातेच्या तब्येतीकडेसुद्धा लक्ष द्या. जमीन किंवा घर किंवा वाहन खरेदी करावी, अशी खूप इच्छा होईल पण नीट विचार करून पाऊल पुढे टाका.

उपाय: घरात सुंदरकांडचा पाठ करा.

धनु

आपल्या कार्याच्या ठिकाणी आपल्या कर्तृत्वाची कसोटी लागण्याचा संभव आहे. वरिष्ठ आपल्याकडून आतापेक्षाही जास्तीच्या कामाची अथवा कौशल्याची अपेक्षा करण्याचा संभव आहे. आणि त्याप्रमाणे तुम्ही त्यांना करून दाखवाल हे सर्व करताना अर्थातच  थोडी चिडचिड होण्याचाही संभव आहे. पण संयमाने वागा.

उपाय : कपाळावर चंदनाचा टिळा लावूनच बाहेर पडा.

मकर

जोडीदाराचे सहकार्य चांगले मिळेल. पण या आठवड्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्टाविण फळ ना मिळते हे तर आपल्याला माहीतच आहे. नोकरीच्या ठिकाणी आपण कष्ट कराल पण आपल्याला हवे तसे  काम सहकारी वर्गाकडून कदाचित होऊ शकणार नाही. पण म्हणून त्यांच्यावर चिडचिड करून काही उपयोग नसतो. समजुतीने घ्यावे.

उपाय: कुलदेवतेची आराधना करा.

कुंभ

अति हाव व अति लोभीपणा करू नका. प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी आणि प्रत्येकवेळी मी म्हणतो तसेच झाले पाहिजे असे वाटणे स्वाभाविक आहे. पण या आठवड्यात तसे होण्याची शक्यता कमी आहे. मुले काहीशी आडमुठेपणा करण्याचा संभव आहे. पण कलाकलाने शांतपणाने विचार केल्याने बरेच प्रश्न सुटतात. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ.

उपाय: शनिवारी शनिला काळे तीळ व तेल वाहा.

मीन

मुलांच्याकडून काही चांगली बातमी कावर येण्याचा संभव आहे. त्यांच्या अभ्यासातील प्रगती पाहून मन समाधान पावेल. पण आईच्या तब्येतीची काळजी घ्या. कदाचित तब्येतीच्या तक्रारीमुळे कदाचित तिची चिडचिड झाली तरी तुम्ही शांत रहा. घर जमीन, जुमला याबाबत काही चर्चा घरामध्ये होण्याची शक्यता आहे.

उपाय: दशरथकृत श्री शनैश्चर स्तोत्र वाचा.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​