Uncategorized

ओटवणे – मांडवफातरवाडीत वादळी पावसात घराचे छप्पर उडाले

ओटवणे : प्रतिनिधी

सह्याद्री पट्ट्यात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाचा फटका ओटवणे गावालाही बसला. ओटवणे मांडवफातरवाडी येथील दत्ताराम बापू रेडकर यांच्या घराचे पत्र्याचे छप्पर उडून नजीकच्या भागात कोसळले. मध्यरात्री अचानक घडलेल्या या घटनेने रेडकर कुटुंबीय घाबरून गेले. या घटनेत दत्ताराम रेडकर यांचे सुमारे दोन लाख रुपयाचे नुकसान झाले. दरम्यान, शेरवाळेवाडीतील अंकुश वारंग, मांडवफातरवाडीतील लक्ष्मी म्हापसेकर, करमळगाळूवाडीतील गजानन रासम यांच्या घरावरही वादळी पावसात झाडे कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. नुकसानीचा पंचनामा तलाठी केतन कांबळे, पोलीस पाटील शेखर गावकर, कोतवाल अर्चना दळवी यांनी केला.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​