Uncategorized

‘आरसीबी’समोर आज मुंबईचे आव्हान – Tarun Bharat

रायपूर : रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरला आज रविवारी रायपूरमध्ये मुंबई इंडियन्सविऊद्धच्या सामन्यात आपल्या फलंदाजी गटाने पुन्हा एकदा ताकद दाखवून सलग दोन सामन्यांतील पराभवाची मालिका खंडित करावी आणि आपली आयपीएल मोहीम पुन्हा ऊळावर आणावी, अशी अपेक्षा असेल.

रॉयल चॅलेंजर्सने हंगामाच्या आरंभी दमदार सुऊवात केली होती. त्यांनी सुऊवातीचे चारही सामने जिंकले होते आणि प्लेऑफमधील प्रवेश केवळ एक औपचारिकता वाटत होता. पण आता परिस्थिती बदलली आहे. गतविजेत्या संघाने आपल्या शेवटच्या पाच सामन्यांपैकी तीन सामने गमावल्याने ते स्पर्धेच्या मध्यास एका छोट्या संकटात सापडले आहेत. 10 सामन्यांतून 12 गुणांसह सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असलेला आरसीबी संघ अजूनही बाद फेरीत प्रवेश करण्याच्या उत्तम स्थितीत आहे. परंतु बेंगळूरच्या संघाला याची निश्चितच जाणीव असेल की, स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात त्यांचा जोर थोडा कमी झाला आहे.

आरसीबी, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स हे संघ 12 गुणांसह बरोबरीत आहेत आणि जयपूरमधील शनिवारच्या सामन्यानंतर राजस्थान किंवा गुजरात यापैकी एक संघ त्यांच्या पुढे जाऊ शकतो. तशा स्थितीत बेंगळूरचा संघ चौथ्या स्थानावर फेकला जाईल. गुणतालिकेतील ही परिस्थिती थोडी चिंताजनक आहे, पण त्या बाह्य घटकाव्यतिरिक्त आरसीबीच्या फलंदाजी विभागाने पुन्हा लय पकडण्याची गरज आहे.

अहमदाबादच्या खेळपट्टीवर टायटन्सविऊद्ध आरसीबीचे फलंदाज 155 धावांच्या पुढे जाऊ शकले नाहीत आणि लखनौ सुपर जायंट्सविऊद्ध डकवर्थ-लुईस-स्टर्न नियमानुसार 9 धावांनी झालेला पराभव सुद्धा दिसतो तितका चुरशीचा नव्हता. आरसीबीला विजय मिळवण्यासाठी शेवटच्या षटकात 19 धावांची गरज होती, पण ते त्या आकड्याच्या जवळपासही पोहोचू शकले नाहीत. आता आरसीबीच्या फलंदाजांना मुंबईच्या आणखी प्रभावी माऱ्याचा सामना करावा लागेल, ज्यात बुमराह, कॉर्बिन बॉश, ए. एम. गझनफर आणि विल जॅक्स यांचा समावेश आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​