Uncategorized

आजगाव मायनिंगविरोधी लढ्याला काँग्रेसचा पाठिंबा

सत्ताधाऱ्यांनी भूमिका स्पष्ट करावी : साक्षी वंजारी

सावंतवाडी : प्रतिनिधी

तालुक्यातील आजगाव व परिसरातील निसर्गसंपन्न भागात जेएसडब्ल्यू (JSW) कंपनीच्या प्रस्तावित मायनिंग प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला असून, या जनआंदोलनाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याची घोषणा काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांनी केली आहे. तसेच काँग्रेसचे वरिष्ठ नेते लवकरच आंदोलक ग्रामस्थांची भेट घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.यावेळी वंजारी यांनी हे आंदोलन पूर्णपणे स्थानिक ग्रामस्थांच्या नेतृत्वाखाली राहावे, कोणत्याही राजकीय किंवा स्वार्थी हस्तक्षेपामुळे त्याची दिशा बदलू नये, असे आवाहन केले.मायनिंग प्रकल्पासाठी प्राथमिक टप्प्यात ड्रोन सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यासाठी जिल्हा परिषद सभागृहात अधिकृत ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत प्रश्न उपस्थित करताना वंजारी म्हणाल्या, “जिल्हा परिषद शिवसेना-भाजपा युतीच्या ताब्यात असताना हा ठराव मंजूर झाला. त्यावेळी सत्ताधारी सदस्य गप्प का होते? याचे उत्तर त्यांनी जनतेला दिले पाहिजे.”तसेच स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. “राज्य आणि केंद्रात सत्ता असताना आजगाव, धाकोरे, मातोंड यांसारख्या निसर्गसंपन्न भागात प्रदूषणकारी प्रकल्प येत असल्याची माहिती नसल्याचे सांगणे हास्यास्पद आहे. सत्ताधाऱ्यांना अशा प्रकल्पांची पूर्वकल्पना असते आणि त्यांच्या जवळची मंडळी परिसरातील जमिनी आधीच खरेदी करण्यास सुरुवात करतात. आजगावमध्येही असेच प्रकार घडत असल्याची चर्चा आहे,” असे त्या म्हणाल्या.पुढे त्या म्हणाल्या, “सत्ताधारी नेत्यांमध्ये खरोखरच हिंमत असेल, तर गावात जाऊन सहानुभूतीचे नाटक करण्यापेक्षा आपल्या सत्तेचा वापर करून हा प्रदूषणकारी प्रकल्प रद्द करून दाखवावा. यासाठी स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी पुढाकार घ्यावा.”‘कळणे’च्या अनुभवातून धडा घ्याकळणे मायनिंगविरोधी आंदोलनाचा संदर्भ देत वंजारी म्हणाल्या की, “पूर्वी कळणे येथे मायनिंगविरोधी आंदोलन सुरू असताना काही दलाल आणि स्वार्थी घटकांनी आंदोलनात प्रवेश करून त्याची दिशा बदलली होती. त्यामुळे आजगावच्या ग्रामस्थांनी सावध राहण्याची गरज आहे. आंदोलन कोणत्याही परिस्थितीत स्थानिक जनतेच्या हातातून जाऊ देऊ नये.” या संपूर्ण संघर्षात काँग्रेस पक्ष ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असा पुनरुच्चार साक्षी वंजारी यांनी केला.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​