Uncategorized

अडीच वर्षे उलटूनही फूटओव्हरब्रिज रखडलेलाच

रेल्वे प्रवाशांचे अतोनात हाल : लोकप्रतिनिधींसह रेल्वे अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष, कामाला गती देण्याची मागणी

बेळगाव : बेळगाव रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण होण्यास जितका कालावधी लागला त्याहून अधिक कालावधी सध्या केवळ एका फूटओव्हरब्रिजच्या कामासाठी लागला आहे. अडीच वर्षे उलटली तरी अद्याप फूटओव्हरब्रिज पूर्णत्वाला आला नाही. यामुळे प्रवाशांना वेळेत रेल्वे गाठण्यासाठी ट्रॅकवरूनच ये-जा करावी लागत आहे. खासदार जगदीश शेट्टर यांनी कंत्राटदाराला तंबी देऊन देखील हे काम पूर्ण झालेले नसल्याने बेळगावमधील प्रवासी वैतागले आहेत.

प्लॅटफॉर्म क्रमांक 1 पासून दक्षिण दरवाजापर्यंत ये-जा करण्यासाठी नवीन फूटओव्हरब्रिज बांधकामाला सुरुवात झाली. यासाठी जुनी लिफ्ट तसेच ब्रिज पाडविण्यात आला. सहा महिन्यांत नवीन फूटओव्हरब्रिज होणे गरजेचे होते. परंतु सुरुवातीला वर्षभर कोणतेच काम झाले नाही. त्यानंतर कासवगतीने या कामाला सुरुवात झाली. फूटओव्हरब्रिज तयार करून पूर्ण झाला असून त्यावरील छतही बसविण्यात आले आहे. आता केवळ दर्शनी बाजूचे काम शिल्लक राहिले आहे.

अडीच वर्षे उलटली तरी अद्याप फूटओव्हरब्रिजचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. यामुळे प्रवाशांना एकतर संपूर्ण रेल्वेस्थानकाला वळसा घालून प्लॅटफॉर्म क्र. 2 व 3 गाठावे लागत आहेत. नाहीतर जीव धोक्यात घालून रेल्वेरूळावरून ये-जा करावी लागत आहे. यामध्ये मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याने नैर्त्रुत्य रेल्वेने फूटओव्हरब्रिजच्या कामाला गंभीरतेने घ्यावे, अशी मागणी होत आहे.

बोगी हॉटेल हटविण्याची मागणी

मोठा गाजावाजा करत रेल्वेस्थानकात बोगी हॉटेल सुरू करण्यात आले होते. परंतु प्रवाशांचा प्रतिसाद मिळू न शकल्याने काहीच दिवसात हॉटेल बंद करावे लागले. परंतु हॉटेलसाठी आणलेली बोगी मात्र आता रेल्वे विभागासाठी डोकेदुखीची ठरू लागली आहे. फूटओव्हरब्रिजच्या दर्शनी भागातील पायऱ्या या बोगीमुळे घालणे अवघड झाले आहे. या जागेचा पार्किंगसाठी वापर झाला असता. परंतु तो देखील अडकून पडला आहे. त्यामुळे याबाबत नैर्त्रुत्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विचार करून ही बोगी हटवावी व फूटओव्हरब्रिजच्या रखडलेल्या कामाला गती द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

फूटओव्हरब्रिजचे काम लवकरच…

बेळगाव रेल्वेस्थानकातील फूटओव्हरब्रिजचे काम सुरुवातीला बरेच दिवस रखडले. परंतु मागील सहा महिन्यांमध्ये या कामाला गती मिळाली आहे. ब्रिजच्या छताचे काम पूर्ण झाले असून आता समोरील बाजूचे काम पूर्णत्वाकडे आहे. येत्या काही दिवसात ब्रिजचे काम पूर्ण होणार असून तो वापरासाठी लवकरच पूर्ण केला जाईल.

-खासदार जगदीश शेट्टर


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​