Successful testing of indigenous AK-203 assault rifle

भारतीय सैन्याची वाढविणार शक्ती : अमेठीत निर्मित रायफलला ‘शेर’ नाव
संरक्षण उत्पादनांवरून भारत सातत्याने आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्नशील आहे. याचदरम्यान देशात संरक्षण उपकरणे निर्माण करण्याच्या दिशेने एक मोठे यश मिळाले आहे. ‘मेक इन इंडिया’ पुढाकाराच्या अंतर्गत एके-203 असॉल्ट रायफल निर्माण करण्यासाठी 2019 साली मोठा निर्णय घेण्यात आला होता. भारत आणि रशियादरम्यान स्थापन संयुक्त उपक्रम ‘इंडो-रशियन रायफल्स प्रायव्हेट लिमिटेड’ने (आयआरआरपीएल) अमेठीतील कोरवा ऑर्डनेंस फॅक्ट्रीत पहिल्या 100 टक्के स्वदेशी एके-203 रायफल्स तयार करण्याचे काम सुरु केले होते. आता या रायफल्स तयार झाल्या असून त्याचे यशस्वी परीक्षण करण्यात आले आहे.
वृत्तसंस्था, अमेठी
भारताच्या पहिल्या 100 टक्के स्वदेशी एके-203 असॉल्ट रायफलचे नाव ‘शेर’ ठेवण्यात आहे. या रायफलची यशस्वीपण स्वदेशात निर्मिती करण्यासह परीक्षणही करण्यात आले आहे. आयआरआरपीएलचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक मेजर जनरल एस.के. शर्मा यांनी एका पोस्टद्वारे यासंबंधी माहिती दिली आहे. आयआरआरपीएलमध्ये आम्हा सर्वांसाठी हा अत्यंत गर्वाचा क्षण आहे. आम्ह 100 टक्के भारतीय घटक आणि सामग्रीने निर्मित पहिली एके-203 रायफल तयार केल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अमेठीतील प्रकल्पात परीक्षण
शेर रायफल यशस्वीपणे स्वदेशात निर्माण करण्यात आली असून फायरिंग करत परीक्षणही करण्यात आले आहे. या रायफलमध्ये वापरण्यात आलेला प्रत्येक घटक आणि सामग्री भारतीय उद्योगाकडून प्राप्त करण्यात आाrल आहे. हे केवळ काही निवडक सुट्या भागांना स्थानिक स्तरावर निर्माण करण्यासारखे नाही. ही रायफल पूर्णपणे ‘100 टक्के खरे स्वदेशीकरण’ आहे. हे आत्मनिर्भर भारताचे खरे उदाहरण असल्याचे उद्गार आयआरआरपीएलचे सीईओ मेजर जनरल एस.के. शर्मा यांनी काढले आहेत.
खास का आहे ‘शेर’ रायफल?
पहिल्या 100 टक्के स्वदेशी रायफलचे फायरिंग (ज्यात बर्स्ट फायरिंग देखील सामील आहे) यशस्वीपणे करण्यात आले आहे आणि प्रारंभिक निष्कर्ष अत्यंत उत्साहजनक राहिले आहेत. आता आम्ही सप्टेंबरमध्ये परीक्षणासाठी सैन्याला सोपविण्याकरता आवश्यक संख्येत 100 टक्के स्वदेशी प्रोटोटाइप निर्माण करण्याच्या दिशेने काम करत आहोत असे मेजर जनरल शर्मा यांनी सांगितले आहे.
उत्पादनाचा मोठा वेग
अत्यंत लवकरच आयआरआरपीएल दर 100 सेकंदांमध्ये एक एके-203 (शेर) रायफल निर्माण करण्याच्या वेगापर्यंत पोहोचणार आहे. क्षमता वाढविणे, स्वदेशीकरण आणि उत्पादनाला प्रभावी करण्याच्या आयआरआरपीएलच्या प्रयत्नांमुळे आम्ही भारतीय सैन्याला जवळपास 6 लाख रायफल्स सोपविण्याची कालमर्यादा जवळपास एक वर्षापूर्वी पूर्ण करण्याच्या स्थितीत आहोत असे शर्मा यांनी सांगितले आहे.
एके-203 असॉल्ट रायफल ‘शेर’
? एके-203 रायफल एक आधुनिक, गॅस-ऑपरेटेड, 7.62गुणिले39 एमएम असॉल्ट रायफल आहे.
? रायफलमध्ये कलाश्निकोव प्लॅटफॉर्मच्या विश्वसनीयतेसह आधुनिक एर्गोनॉमिक्स देखील आहे.
? रायफलमध्ये मॉड्यूल एक्सेसरी रेल्स आणि सद्यकाळातील संघर्षाच्या वातावरणानुसार अचूक निशाणा साधण्याची क्षमता.
? ही रायफल प्रति मिनिट 700 राउंड फायर करू शकते आणि याची प्रभावी रेंज 800 मीटरपर्यंत आहे.
? एके-203 ही जुन्या इन्सास रायफलपेक्षा खूपच अधिक प्रभावी असल्याचे तज्ञांचे सांगणे आहे.
? ही अधिक घातक असून वापरण्यास सोपी आणि कुठल्याही बिघाडाशिवाय काम करू शकते.
? इन्सास रायफल्सच्या जागी देशात निर्मित 6 लाखाहून अधिक एके-203 असॉल्ट रायफल्सना सामील केले जाणार.
Source link



