Uncategorized

Solapur News : शहरातील रस्त्यांवर जिकडे तिकडे खड्डेच खड्डे!

                            केबलच्या नावाखाली चांगले रस्ते उखडण्याचे काम सुरू

सोलापूर : मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी मे महिना हा अत्यंत महत्त्वाचा आहे. ड्रेनेजची मॅन हॉल स्वच्छ करणे. नाले खोलीकरण तसेच स्वच्छता मोहीम राबवणे. शहरातील रस्ते करणे तसेच खड्डे बुजवणे. धोकादायक इमारतींना नोटिसा देऊन त्या पाडणे. या महत्त्वाच्या बाबीकडे सोलापूर महापालिकेकडून फारसे काम होताना दिसत नाही.

उलट सोलापूर शहरातील जे रस्ते चांगले आहेत ते केबल टाकण्याच्या नावाखाली उखडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शहरात जिकडे तिकडे खड्डेच खड्डे दिसून येत आहेत. 

शहरात स्वच्छता मोहिमेकडे देखील फारसे लक्ष दिले जात नाही. स्मार्ट सिटी योजनेतून शहरात दहा किलोमीटर रस्ते करण्यासाठी १०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. या रस्त्यावर देखील अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. मात्र त्याच्या मेंटेनन्सकडे महापालिका लक्ष देत नाही. झोन अधिकारी कधी बजेट नाही तर कधी प्रिमिक्स नाही असं कारण देतात.

आता युद्धामुळे डांबराचे भाव वाढले आहेत. तसेच महापालिका आमची साठ कोटी रुपयांची बिले देत नाही अशी कारणे सांगून आता कामाला विलंब लावला जात आहे. त्यामुळे या महिन्यात ही महत्त्वाची कामे न झाल्यास पावसाळ्यात शहरवासीयांना मोठा अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

जुळे सोलापुरातील कृष्णा कॉलनीसह अन्य नगरातील रस्त्यांवर कंत्राटदारांकडून खडी अंथरण्यात आली असून याला महिना उलटून गेला; पण अद्याप डांबरीकरण करण्यात आले नाही. ही खडी उखडली असून या रस्त्यावरून ये-जा करताना दुचाकी घसरून अपघात होत आहेत. केवळ कंत्राटदारांच्या चुकीमुळे या दुचाकीस्वारांना नाहकपणे जखमी व्हावे लागत आहे. या रस्त्यांचे पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​