Uncategorized

Satara News : विधवांच्या जाचक प्रथांना कायमची मुठमाती विधवा नव्हे आता ‘पूर्णागी’

 विधवांच्या जाचक प्रथांना कायमची मुठमाती विधवा नव्हे आता ‘पूर्णागी’ 

एकंबे : क्रांतिकारकांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरेगाव तालुक्यातील कुमठे गाबाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून समाजातील विधवांवर लादल्या जाणाऱ्या जाचक आणि अमानवी प्रथांना कायमस्वरूपी मुठमाती देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.विधवा महिलांना सन्मानाने आणि समानतेने जगता यावे, यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने पुढाकार घेतला असून या निर्णयाला गावातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण यांच्या पुढाकाराने कुमठे ग्रामपंचायत आणि जयहिंद फाउंडेशन खटाव तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमलता किसन फडतरे,सचिव पूनम यशवंत साळुंखे आणि सभासद सुभेदार चंद्रकांत इंगळे तसेच उमाताई सागर जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दिनी कुमठे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यक्रम पार पडला.

या वेळी अनेक दशकांपासून रूढ असलेल्या कपाळावरील कुंकू पुसणे,बांगळ्या फोडणे, जोडवी काडणे तसेच मंगल कार्यात विधवा महिलांना दूर ठेवण्याच्या प्रथांना पूर्णतः तिलांजली देण्याचा निर्धार करण्यात आला. यापुढे विधवा महिलांना ‘विधवा’म्हणून संबोधण्याऐवजी ‘पूर्णांगी’असे संबोधावे.

तसेच सर्व धार्मिक व पथदर्शी निर्णय आपल्या माता-भगिनींना दुय्यम वागणूक देणे हे प्रगत समाजाचे लक्षण नाही, कुमठे गावाने घेतलेला हा निर्णय संपूर्ण सातारा जिल्ह्यासाठी पथदर्शक ठरेल. कुमठे ग्रामस्थांच्या या निर्णयामुळे गावाचा सामाजिक नावलौकिक उंचावणार असून,समाज परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. संतोष चव्हाण,सरपंच सामाजिक कार्यक्रमांत त्यांना समान स्थान द्यावे, असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​