Uncategorized

Rajapur News | राजापुरात बिबट्याची दहशत! चार वर्षांच्या गायीवर हल्ला करून केले ठार, शेतकरी भयभीत

राजापूर: तालुक्यातील श्रिणमिणी-कुणबीवाडी परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून बिबट्याने चार वर्षाच्या गायीवर हल्ला करून तिला ठार केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये मीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विगगिणी कुणबीवाडी येथील शेतकरी कृष्णा हरी डोंगरकर यांची गुरे रानात चरण्यासाठी गेली होती. यावेळी गावातील जुने नवलादेवी मंदिर व मातशीचे कुट परिसरात बिबट्याने त्यांच्या चार वर्षांच्या गायीवर हल्ला केला. या हल्ल्यात गाय ठार झाली. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेकडून पंचनामा करण्यात आला, त्यानुसार शेतकरी कृष्णा डोंगरकर यांचे सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

पंचनामा करताना रवींद्र डोंगरकर, दत्ताराम डोंगरकर, विजय पाध्ये, पोलीसपाटील अशोक डोंगरकर, रमेश होंगरकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राठोड यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​