Uncategorized

Omraje Nimbalkar | ठाकरे गटाला मोठा धक्का! ओमराजे निंबाळकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाणार; धाराशिवमध्ये मोठी घोषणा

धाराशिव – विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर हे गेले बऱ्याच दिवसांपासुन कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत आहेत. एकीकडे दोन दशकांपेक्षा अधिक काळ चाललेल्या त्यांच्या वडिलांच्या, म्हणजेच पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे, ज्यामुळे निंबाळकर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तर दुसरीकडे, शिवसेना (ठाकरे गट) पक्षातील खासदारांच्या संभाव्य बंडाच्या चर्चांमध्ये त्यांचे नाव जोडले जात असल्याने त्यांच्या आगामी राजकीय भूमिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अखेर या चर्चांना आज पुर्णविराम मिळाला आहे… ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केलं आहे…

काय म्हणाले ओमराजे निंबाळकर?

ओमराजे निंबाळकर म्हणाले,गेल्या सात वर्षांपासून विरोधी पक्षात आहे. खासदार असूनही लोकांची कामे करण्यास अडचणी येतात. लोक कामे घेऊन येतात. दर वेळी त्यांना या वेळी मंजूर होणार नाही, असे किती दिवस सांगायचे? सत्तेत राहिल्याशिवाय विकास होत नाही. मतदारसंघाचा विकास आणि लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत जाणार आहे, अशी माहिती धाराशिवचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी गोवर्धनवाडी (ता. धाराशिव) येथे दिली.

ते पुढे म्हणाले, की नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्हाला जिल्ह्यात एकाही ठिकाणी यश मिळाले नाही. आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी लोकसेवेसाठी सदैव कार्यरत होते; तरीही पराभव झाला. कुठल्या लोभापायी मी शिवसेनेत जात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ऑपरेशन टायगर यशस्वी

गेल्या बऱ्याच दिवसांपासुन ऑपरेशन टायगर चर्चेत आहे… ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटात संपर्कात होते.. त्यामुळे लवकरचं ते शिवसेनेत जाणार असल्याचे बोललं जात होत. यामध्ये विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर याचं देखील नाव चर्चेत होत… गेले 2 दिवसांपासुन ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे ओमराजे यांची मनधरणी करत असल्याचे प्रयत्न करत होते अखेर या चर्चांना आज पुर्णविराम मिळाला आहे… ओमराजे यांच्या या प्रतिक्रियेनंतर ठाकरे नेत्यांकडुन काय प्रतिक्रीया येते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे…

 

 

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​