Uncategorized

Living with angry people is also harmful.

वेगाने वाढू लागते वय, आरोग्यावर पडतो गंभीर परिणाम

शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी मानसिक शांतता अत्यंत आवश्यक असल्याचे अनेक अध्ययनांनी स्पष्ट केले आहे. अधिक तणाव असो किंवा संताप, त्याचा आरोग्यावर अनेक प्रकारे नकारात्मक प्रभाव पडू शकतो. आरोग्य तज्ञ सातत्याने ज्या लोकांना अधिक संताप येतो, त्यांच्यात हृदयविकार, रक्तदाबाच्या समस्यांसोबत एंक्झाइटी आणि नैराश्य होण्याची जोखिमही अधिक असू शकते असा अलर्ट देत असतात.

परंतु आता अलिकडच्या अध्ययनांमध्ये संशोधकांनी क्रोधी लोकांच्या अधिक संपर्कात राहिल्यास त्याचा आरोग्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो असा इशारा दिला आहे. याचबरोबर ही स्थिती लोकांचे वय वाढविणारी ठरू शकते. संताप करणारा व्यक्ती स्वत:च्या आरोग्याचे सर्वाधिक नुकसान करून घेतो असे आम्ही मानतो, परंतु आता विज्ञानाने याचा एक असा पैलू समोर ठेवला आहे. नुकसान केवळ संताप करणाऱ्या इसमाचे होत नाही, तर त्या संतापाला रोज सहन करणारे लोकही याची मोठी किंमत मोजत असतात असे संशोधकांचे सांगणे आहे.

संताप किती धोकादायक असू शकतो?

संताप येणे एक सामान्य मानवीय भावना आहे, परंतु जेव्हा ही वारंवार, अत्यंत अधिक आणि दीर्घकाळापर्यंत कायम राहते, तेव्हा केवळ नात्यांनाच नव्हे तर शरीर आणि मानसिक आरोग्यालाही प्रभावित करू शकते असे आरोग्य तज्ञांचे सांगणे आहे. अध्ययनांमधून संतापादरम्यान शरीरात फाइट ऑर फ्लाइट प्रतिक्रिया सक्रीय होत असल्याचे कळले आहे. त्यावेळी एड्रनालिन आणि कोर्टिसोल यासारखे स्ट्रेस हार्मोन वेगाने वाढू लागतात, ज्यामुळे हृदयाचे ठोके, रक्तदाब आणि श्वसनाचा वेग वाढतो. ही स्थिती वारंवार होत असल्यास शरीराच्या अनेक अवयवांवर दीर्घकालीन नकारात्मक प्रभाव पडू शकतो.

दीर्घकाळापर्यंत राहणारा संताप हृदयविकार, मानसिक आरोग्य समस्या, प्रतिरक्षा प्रणालीच्या समस्या, झोपेत बिघाड आणि पचनसंबंधी समस्यांची जोखीम वाढवितो असे अमेरिकन हार्ट असोसिएशनचे तज्ञ सांगतात.

तणावयुक्त वातावरण

जर तुमच्या जीवनात कुठलाही असा व्यक्ती आहे, ज्याच्यासोबतचे प्रत्येक संभाषण तणावात बदलते, ज्याच्या नाराजीची भीती तुमच्या मनात नेहमी राहते, किंवा ज्याच्यामुळे घर आणि कार्यालयातील वातावरण नेहमी जड जाणवते, तर हे पेवळ भावनात्मक  समस्या नाही, असे संबंध तुमच्या शरीरात असे बदल सुरू करतात, जे काळापूर्वी वृद्धत्वाकडे ढकलू लागतात असे एका अहवालाद्वारे आरोग्यतज्ञांनी म्हटले आहे.

वैज्ञानिकांचा सल्ला

सातत्याने तणाव देणारे नाते शरीरात असे जैविक बदल निर्माण करते, ज्याचा प्रभाव आमच्या वय वाढण्याच्या वेगावरही दिसून येतो. म्हणजेच ज्याच्यासोबत तुम्ही रोज राहतात, त्याचे वर्तन तुमच्या शरीराच्या पेशींनाहीप प्रभावित करू शकते. जर्नल प्रोसिडिंग्स ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित अध्ययनात संशोधकांनी तुमच्या आसपास नातत्यांमध्ये सातत्याने तणावाचे कारण ठरणारा व्यक्ती असल्यास त्याच्यापासून अंतर राखणेच तुमच्या आरोग्यासाठी चांगले ठरेल असा सल्ला दिला आहे. कुठल्याही संतापी व्यक्तीची साथ तुम्हाला 1.5 टक्क्यांच्या दराच्या वेगासह वृद्धत्वाकडे लोटत आहे. मानसिक शांततेत अडथळे आणणारे संबंध केवळ मनालाच दुखावत नाहीत, तर सततच्या तणावाद्वारे आमच्या आर्युमानालाही वेगाने घटवत आहेत.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​