Kolhapur news | कोल्हापुरात महापालिकेचा हातोडा! बिंदू चौकातील एम. के. टॉवरमधील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

बिंदू चौकात अनधिकृत बांधकामावर महापालिकेची कारवाई
कोल्हापूर – बिंदू चौक परिसरातील सि.स. नं. ५२५ येथील एम. के. टॉवर अपार्टमेंटमध्ये दिलीप मोरे यांनी मंजूर नकाशाव्यतिरिक्त जादा व विनापरवाना बांधकाम केल्यामुळे मंगळवारी महापालिकेने तळघरातील बाथरूम व टॉयलेट्सचे अनधिकृत बांधकाम हटवले आहे. उर्वरित कारवाई बुधवारी करण्यात येणार आहे.
या प्रकरणी अलका माने यांनी दिलीप मोरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सप्टेंबर२०२३ मध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ५३(१) अंतर्गत नोटीस बजावली होती. १५ जानेवारी १९९९ रोजी मंजूर नकाशाव्यतिरिक्त केलेले बांधकाम ३० दिवसांत काढून टाकण्याचे आदेशही दिले होते. मात्र संबंधितांनी अनधिकृत बांधकाम न हटवल्याने महापालिकेने बंदोबस्त मागवून कारवाईचे नियोजन केले.कोल्हापूर येथील बिंदू चौक परिसरातील अपार्टमेंटमध्ये तळमजल्यावर अवैधरित्या बांधलेले स्वच्छतागृह महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने मंगळवारी हटवले. होते. बंदोबस्त उपलब्ध न झाल्याने कारवाई रखडली होती.
दरम्यान, अलका माने यांनीकोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या सूचनेनुसार महापालिकेने आठआठवड्यांत कारवाई करण्याचे मान्य केले होते. त्या अनुषंगाने मंगळवारी पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, सहाय्यक संचालक नगररचना प्रशांत भोसले व उपशहर रचनाकार एन. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, पंकज जाधव, अदिती पोवार, मुकादम सचिन जाधव, पोलीस कर्मचारी व क विभागीय कार्यालय क्र.२ कडील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.
Source link



