Jejuri Warkari Accident | आषाढी वारीवर काळाचा घाला! जेजुरीत ट्रक घुसला, हृदयद्रावक VIDEO समोर

जेजुरी – काही दिवसांवर आषाढी एकादशी येऊन ठेपली आहे.. त्यासाठी राज्यभरातुन वारकरी चालत पंढरीच्या दिशेने निघाले आहेत.. कुणी पायी तर कुणी गाड्यांवरुन … सगळीकडे आंनदाचे वातावरण असतानाचं .. जेजुरीत वारकऱ्यांच्या भीषण अपघात झाला आहे… ज्याच्या व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे..
सदर अपघाताचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ट्रक धडकण्याआधी वारकरी भजन-किर्तन, तुझ्यासाठी आलो मी देवा…म्हणत पायी चालत होते. तितक्यात मागून ट्रकने त्यांना धडक दिली. यानंतर सगळीकडे आक्रोश झाल्याचं व्हिडीओमध्ये दिसून येत आहे..
या दुर्दैवी घटनेत सहा वारकरी जखमी झाले असुन.तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. राजश्री शंकर भोसले, माधवी राजाराम सरवडे, नंदा पवार या तीन महिला या अपघातात मयत झाल्या असून या तीनही महिला सांगली जिल्ह्यातील होत्या.
म्हणुन अपघात घडला….
सदर ट्रक नांदेडचा असुन. ट्रकचा ड्रायव्हर 70 वर्षे वयाचा होता. ट्रक ड्रायवरने तापाच्या गोळ्या घेतल्यानं ग्लानी आली. त्यानंतर ड्रायवरचा ट्रकवरील ताबा सुटला आणि थेट पुढे चालणाऱ्या वारकऱ्यांच्या अंगावर गेला, अशी माहिती पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांनी सांगितले…



