Dharwadi style for Maharashtra buses

टाटा मोटर्समध्ये ‘राजमाता जिजाऊ’ बसचे निर्माण
बेळगाव : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या ताफ्यामध्ये नव्याने दाखल होत असलेल्या ‘राजमाता जिजाऊ’ या बस बेळगावजवळील धारवाड येथे तयार केल्या जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या या केशरी रंगाच्या नव्या बसला कर्नाटकी लुक मिळत आहे. तयार झालेल्या नव्या बस बेळगावमार्गे पुणे, मुंबईच्या दिशेने रवाना होत असल्याचे चित्र राष्ट्रीय महामार्गावर दिसत आहे. धारवाड येथील टाटा मोटर्सच्या प्लांटमध्ये सध्या एमएसआरटीसीच्या नव्या बस तयार केल्या जात आहेत. केशरी रंगातील ‘राजमाता जिजाऊ’ या बस अतिशय सुरेख व आरामदायी असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात या बस धावणार असल्या तरी त्या तयार मात्र धारवाडमध्ये होत असल्याने धारवाड, बेळगाव या परिसरात या नव्या बस राष्ट्रीय महामार्गावरून धावत आहेत.
बेळगावमध्येही तयार होत होती ‘शिवशाही’
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या अनेक बस यापूर्वीही बेळगावमध्ये तयार झाल्या आहेत. विशेषत: आरामदायी एसी ‘शिवशाही’ बस बेळगावमध्ये तयार करण्यात आली होती. या आरामदायी सर्व बस बेळगावमध्ये तयार होऊन संपूर्ण महाराष्ट्रात धावत होत्या. काही वर्षांपूर्वी तयार झालेल्या नव्या आयशर लाल रंगातील बसदेखील बेळगावच्या एम. जी. मोटर्समध्ये तयार करण्यात आल्या होत्या.
Source link


