Uncategorized

Ashadhi Ekadashi 2026 | आषाढी वारीसाठी सोलापूर सज्ज; १० मानाच्या पालख्यांचं वेळापत्रक जाहीर

सोलापूर -आषाढी एकादशी २५ जुलै २०२६ रोजी भरणार असून, पंढरपूरकडे मार्गक्रमण करणाऱ्या महाराष्ट्रातील १० प्रमुख मानाच्या पालख्यांचे प्रस्थान व सोलापूर जिल्हा हद्दीतील आगमनाचे वेळापत्रक जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. सर्व पालख्या १६ ते २० जुलै २०२६ या पाच दिवसांत जिल्ह्यात दाखल होणार आहेत. या पालख्यांचे सोलापूर जिल्हा हद्दीत स्वागत करण्यासाठी तसेच त्यांच्या अडीअडचणी व समस्या सोडवण्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे.

अनुक्रमांक १ ची श्री संत ज्ञानेश्वर महाराज, आळंदी पालखी दि. ०८ जुलै २०२६ रोजी प्रस्थान करून दि. १९ जुलै २०२६ रोजी सोलापूर जिल्हा हद्दीत दाखल होईल. अनुक्रमांक २ ची श्री संत तुकाराम महाराज, देहू पालखी दि. ०७ जुलै २०२६ रोजी निघणार असून दि. २० जुलै २०२६ रोजी जिल्ह्यात येईल. अनुक्रमांक ३ ची श्री संत मुक्ताबाई, मुक्ताईनगर पालखी दि. २४ जून २०२६ रोजी प्रस्थान करून दि. १९ जुलै २०२६ रोजी जिल्हा हद्दीत पोहोचेल.

अनुक्रमांक ४ ची श्री संत सोपान महाराज, सासवड पालखी दि. १२ जुलै २०२६ रोजी निघून दि. २० जुलै २०२६ रोजी सोलापूर जिल्ह्यात येईल. अनुक्रमांक ५ ची श्री संत निवृत्तीनाथ महाराज, त्र्यंबकेश्वर पालखी दि. २९ जून २०२६ रोजी प्रस्थान करून दि. १८ जुलै २०२६ रोजी जिल्हा हद्दीत दाखल होईल. अनुक्रमांक ६ ची श्री संत एकनाथ महाराज, पंढरपूर पालखी दि. ०७ जुलै २०२६ रोजी निघणार असून दि. १९ जुलै २०२६ रोजी जिल्ह्यात येईल.

अनुक्रमांक ७ ची श्री संत गजानन महाराज, शेगाव पालखी दि. २१ जून २०२६ रोजी प्रस्थान करून दि. १७ जुलै २०२६ रोजी सोलापूर जिल्हा हद्दीत दाखल होईल. अनुक्रमांक ८ ची श्री विठ्ठल रुक्माई संस्थान, कौंडण्यपूर पालखी दि. १९ जून २०२६ रोजी निघून सर्वात प्रथम दि. १६ जुलै २०२६ रोजी जिल्ह्यात येणार आहे. अनुक्रमांक ९ ची श्री संत चांगावटेश्वर देवस्थान, सासवड पालखी दि. १२ जून २०२६ रोजी प्रस्थान करून दि. २० जुलै २०२६ रोजी जिल्हा हद्दीत दाखल होईल. अनुक्रमांक १० ची श्री संत निळोबाराय महाराज, पिंपळनेर पालखी दि. १० जुलै २०२६ रोजी निघून दि. १९ जुलै २०२६ रोजी सोलापूर जिल्ह्यात येईल.

१९ जुलै रोजी ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई, एकनाथ महाराज व निळोबाराय महाराज अशा ४ पालख्या, तर २० जुलै रोजी तुकाराम महाराज, सोपान महाराज व चांगावटेश्वर देवस्थान अशा ३ पालख्या एकाच दिवशी जिल्ह्यात दाखल होणार आहे.

लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येक पालखीसाठी नोडल व सहाय्यक समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. वारकरी व नागरिकांनी प्रवासात अडचण आल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी किंवा जिल्हा नियंत्रण कक्ष क्र. ०२१७-२७३१०१० येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​