Uncategorized

साक्षरतेतून सक्षमीकरणाचा संदेश; मालवणात प्रौढ साक्षरता दिन उत्साहात; लायन्स क्लब ऑफ मालवणचा उपक्रम

मालवण | प्रतिनिधी : साक्षरतेचे महत्त्व आणि प्रौढांच्या सक्षमीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ मालवणच्या वतीने आंतरराष्ट्रीय प्रौढ साक्षरता दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. ‘प्रत्येक प्रौढ साक्षर नागरिक म्हणजे विकसित भारताची पायरी’ हा संदेश यावेळी देण्यात आला.

प्रौढ साक्षरता ही केवळ शिक्षणापुरती मर्यादित नसून व्यक्तीचा आत्मविश्वास वाढविणे, जीवनमान उंचावणे आणि समाजाच्या विकासाला चालना देण्याचे प्रभावी माध्यम आहे, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

यानिमित्त आयोजित कार्यक्रमात आहारतज्ज्ञ डॉ. गार्गी ओरसकर यांनी ‘आहाराचे महत्त्व आणि योग्य आहार’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. दैनंदिन जीवनात संतुलित आणि सकस आहाराचे महत्त्व, योग्य आहाराची निवड तसेच आरोग्यदायी जीवनशैली याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाला उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

दरम्यान, लायन्स क्लब ऑफ मालवणची सप्टेंबर महिन्यातील जनरल मीटिंगही यावेळी पार पडली. बैठकीच्या प्रारंभी क्लबच्या विद्यमान सेक्रेटरी पूनम चव्हाण यांच्या मातोश्री कै. सरोज परब यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

प्रौढ साक्षरता दिनाचे औचित्य साधून क्लबच्या वतीने विशेष सर्क्युलर प्रकाशित करण्यात आले. साक्षरतेमुळे व्यक्तीमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो, निर्णयक्षमता वाढते आणि सामाजिक व आर्थिक प्रगतीच्या संधी उपलब्ध होतात, याबाबत जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांच्या हस्ते डॉ. गार्गी ओरसकर यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, खजिनदार राधिका मोंडकर, गणेश प्रभुलकर, महेश अंधारी, रुजरीओ पिंटो, मुकेश बावकर, राजा शंकदास, जयश्री हडकर, शांती पटेल, उमेश शिरोडकर, सचिन शरबिद्रे, मनाली दळवी, मीना घुर्ये, रूपा कांदळगावकर आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​