Uncategorized

रामभाऊ परुळेकर महाविद्यालयाच्या नक्षत्रा जावकरची विभागस्तरावर निवड; टेबल टेनिसमध्ये दमदार कामगिरी

मालवण / प्रतिनिधी : क्रीडा व युवा सेवा संचालनालय, पुणे तसेच जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या  नक्षत्रा परेश जावकर हिने प्रभावी कामगिरी करत विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे.

19 वर्षांखालील मुलींच्या गटातील जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा 8 सप्टेंबर 2026 रोजी मालवण येथील जय गणेश स्कूलमध्ये पार पडली. या स्पर्धेत नक्षत्रा जावकर हिने उत्कृष्ट खेळीचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर प्रभावी मात केली. तिच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत तिची विभागस्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

नक्षत्राच्या या यशामुळे रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. तिच्या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष किरण जी. ठाकूर, कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सचिव चंद्रशेखर कुशे आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय केनवडेकर यांनी नक्षत्राचे अभिनंदन केले.

विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल नक्षत्राला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तिच्या या यशासाठी सौ. स्नेहा चंद्रशेखर बर्वे यांचेही सहकार्य लाभले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​