Uncategorized

वेर्ले फौजदारवाडी ते लिगवतवाडी स्ट्रीट लाईटचे लोकार्पण; परिसर झाला प्रकाशमय

सावंतवाडी : वेर्ले ग्रामपंचायतीच्या माध्यमातून फौजदारवाडी ते लिगवतवाडी, अनिल लिगवत यांच्या घरापर्यंत बसविण्यात आलेल्या स्ट्रीट लाईटचे लोकार्पण करण्यात आले. सरपंच रुचिता राऊळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण करण्यात आले, तर ज्येष्ठ मार्गदर्शक पांडुरंग राऊळ यांच्या हस्ते स्ट्रीट लाईटचा बटन सुरू करून प्रकाश व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली.

स्ट्रीट लाईट सुरू झाल्यामुळे फौजदारवाडी–लिगवतवाडी परिसर प्रकाशमय झाला असून, रात्रीच्या वेळी नागरिकांची होणारी गैरसोय दूर झाली आहे. या सुविधेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य सूरज राऊळ, ममता राऊळ, चंद्रकला गोसावी, बाळू गावडे तसेच लिगवतवाडी–फौजदारवाडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वेर्ले ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील विविध विकासात्मक कामे सातत्याने हाती घेण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

स्ट्रीट लाईटचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी अनिल लिगवत, श्रीधर राऊळ, यशवंत घाडी, संजय घाडी, पीठजी राऊळ आणि संकेत राऊळ यांनी विशेष सहकार्य केले.

या कामासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे आणि संबंधितांचे वेर्ले ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ. रुचिता राऊळ यांनी मनःपूर्वक आभार मानले. नवीन प्रकाश व्यवस्थेमुळे परिसरातील नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ मार्ग उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे स्वागत केले.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​