Uncategorized

दक्षिण विभाग दुलीप करंडकाच्या अंतिम फेरीत दाखल

दुलीप ट्रॉफी लढत : कर्णधार तिलक वर्माची सलग दुसऱ्यांदा प्रभावी खेळी, उत्तर विभागावर 7 गडी राखून विजय

वृत्तसंस्था/बेंगळूर

कर्णधार तिलक वर्मा याने सलग दुसऱ्यांदा प्रभावी खेळी करत दक्षिण विभागाला दुलीप करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचविले. उपांत्य सामन्याच्या चौथ्या आणि अंतिम दिवशी दक्षिण विभागाने उत्तर विभागाचा सात गडी राखून पराभव केला. 181 धावांचे लक्ष्य गाठताना तिलक (नाबाद 51) आणि रविचंद्रन स्मरण (नाबाद 32) यांनी चौथ्या गड्यासाठी अभेद्य 80 धावांची भागीदारी केली आणि दिवसाच्या पहिल्या दोन सत्रांतच संघाला विजय मिळवून दिला. दुसऱ्या सत्राच्या अखेरीस दक्षिण विभागाने 3 बाद 182 धावा केल्या. आता 6 सप्टेंबरपासून चेन्नई येथे होणाऱ्या अंतिम सामन्यात त्यांचा सामना पूर्व विभागाशी होईल.

पहिल्या डावात नाबाद 116 धावा करून संघाला 117 धावांची निर्णायक आघाडी मिळवून देणारा तिलक यावेळी संघ 3 बाद 102 अशा कठीण स्थितीत असताना फलंदाजीला आला होता. मात्र अफगाणिस्तानविऊद्धच्या आगामी टी-20 मालिकेसाठी भारताचा उपकर्णधार असलेल्या या डावखुऱ्या फलंदाजाने पुन्हा एकदा संयम आणि तंत्राचे प्रदर्शन केले. त्याने वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार आणि चतुर डावखुरा फिरकीपटू अबिद मुश्ताक यांच्या नेतृत्वाखालील उत्तर विभागाच्या गोलंदाजांचा समर्थपणे सामना केला.

ब्रारने शरीराच्या वरच्या भागावर धडकणारे चेंडू टाकून त्याच्या जिद्दीची परीक्षा घेतली, तर मुश्ताकने खेळपट्टीवरील असमान उसळीचा वापर करून तिलकच्या पायांच्या हालचालींना आव्हान दिले. तिलकने या आव्हानांचा शानदारपणे सामना केला आणि ‘ऑफ-साइड’ला काही उत्कृष्ट ‘ड्राइव्ह्ज’ लगावले. एकदा स्थिरावल्यानंतर तिलकने मुश्ताकच्या गोलंदाजीवर ‘रिव्हर्स स्वीप’ आणि ‘पॅडल स्वीप’चे फटके मारत संघाला विजयाच्या लक्ष्याकडे नेले.

दुसऱ्या टोकाला असलेल्या स्मरणने त्याला उत्तम साथ दिली. त्याने प्रभावीपणे स्ट्राईक फिरता ठेवला आणि प्रसंगी आक्रमक फटकेही लगावले. निशांत सिंधूच्या गोलंदाजीवर या तऊण डावखुऱ्या फलंदाजाने मारलेला जबरदस्त ‘ऑफ-ड्राइव्ह’ पाहण्यासारखा होता. या दोन्ही डावखुऱ्या फलंदाजांच्या आत्मविश्वासपूर्ण खेळींमुळे दक्षिण विभागाला सुऊवातीच्या धक्क्यांतून सावरता आले. यात नारायण जगदीशन (43) आणि रिकी भुई (42) यांनी सलामीच्या जोडीसाठी केलेल्या 64 धावांचाही मोलाचा वाटा राहिला. ब्रारच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक वाधवानने जगदीशनचा झेल सोडला तेव्हा तो 14 धावांवर होता. जगदीशनची या धिप्पाड वेगवान गोलंदाजाशी काहीशी बाचाबाचीही झाली.

अखेरीस सामन्याच्या चारही दिवस फलंदाजी करणाऱ्या तिलकच्याच बॅटमधून विजयी धावा आल्या. त्याने कामचलावू लेगस्पिनर कामरान इक्बालच्या चेंडूवर ‘कव्हर्स’च्या दिशेने चौकार मारून सामना जिंकून दिला. त्यापूर्वी उत्तर विभाग संघाने जेव्हा 7 बाद 256 धावांवरून आपला दुसरा डाव पुढे सुरू केला तेव्हा त्यांच्यासाठीही काही सकारात्मक क्षण आले. अंशुल कंबोजने 29 चेंडूंत केलेल्या 36 धावांच्या खेळीमुळे त्यांना आपली आघाडी 180 धावांच्या भक्कम टप्प्यापर्यंत नेण्यास मदत झाली. दक्षिण विभाग संघाने सुऊवातीलाच तीन गडी गमावल्यामुळे आणि खेळपट्टीची अवस्था पाहता विजयासाठीचे लक्ष्य गाठणे कठीण वाटत होते.

संक्षिप्त धावफलक

पहिला डाव : उत्तर विभाग 195, दक्षिण विभाग 312, दुसरा डाव : उत्तर विभाग 297 (सनत सांगवान 76, आयुष दोसेजा 52, निशांत सिंधू 35, अन्शुल कंबोज 36 धावा, निधेश 5-56, साईतेजा 2-57, गोपाल 2-86), दक्षिण विभाग 3 बाद 182 (रिकी भुई 42, जगदीशन 43, तिलक वर्मा नाबाद 51, स्मरण रविचंद्रन नाबाद 32, अबिद मुश्ताक 2-55)


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​