Uncategorized

‘कोमसाप’च्या सिंधुदुर्ग नाट्यशाखा समितीवर जिल्ह्यातील चार कलाकारांची निवड

सावंतवाडी / प्रतिनिधी : कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) यांच्या नाट्यशाखेची स्थापना करण्यात आली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार रंगकर्मींची नाट्यशाखा समितीवर निवड करण्यात आली आहे. जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत या निवडीची घोषणा करण्यात आली.

कोमसापचे केंद्रीय कार्याध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष व नाटककार प्रदीप ढवळ यांनी कोमसाप सिंधुदुर्ग नाट्यशाखा समिती जाहीर केली. या समितीवर अभय खडपकर (कणकवली), वर्षा वैद्य (कुडाळ), संजय शिंदे (मालवण) आणि अभिनेते-दिग्दर्शक बाळ पुराणिक (सावंतवाडी) यांची निवड करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाट्यकलेला मोठी परंपरा असून, विविध माध्यमांतून या कलेला पुढे नेणाऱ्या कलाकारांच्या कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

बाळ पुराणिक हे सुमारे175 वर्षांची परंपरा असलेल्या संगीत नाट्यकलेच्या जतनासाठी कार्यरत आहेत. वर्षा वैद्य यांनी बालनाट्यांसह विविध नाटकांमध्ये भूमिका साकारल्या असून, एकांकिका स्पर्धांमध्येही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. संजय शिंदे हे नाट्य दिग्दर्शक, लेखक आणि कलाकार म्हणून कार्यरत आहेत. तर अभय खडपकर यांनी नाट्य, चित्रपट तसेच विविध कला क्षेत्रांत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ठसा उमटवला आहे.

सिंधुदुर्गातील नाट्यकलेला प्रोत्साहन देण्यासाठी कोमसापकडून नाट्यशाखेला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही प्रदीप ढवळ यांनी दिली.

यावेळी कोमसाप जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, जिल्हा कार्यवाह ॲड. संतोष सावंत, रुजारिओ पिंटो, खजिनदार अनंत वैद्य, अभिमन्यू लोंढे, सहसचिव सुरेश पवार, संतोष वालावलकर, दीपली काजरेकर, वृंदा कांबळी, संदीप वालावलकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

नाट्यशाखा समितीवर निवड झाल्याबद्दल वर्षा वैद्य आणि बाळ पुराणिक यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​