Uncategorized

गणेश चतुर्थीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करा; आंबा-काजू बागायतदार व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष काका ढोके यांची मागणी

देवगड : गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी करण्यात आलेल्या आंदोलनानंतर शासनाने देवगड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी प्रति कलम 220 रुपये मदत जाहीर केली आहे. या मदतीसाठी सुमारे 6 हजार पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून, मात्र गणेश चतुर्थीचा सण जवळ आला असतानाही मदतीची रक्कम अद्याप खात्यावर जमा झालेली नाही. गणेशोत्सवापूर्वी शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाई तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी, अशी मागणी आंबा-काजू बागायतदार व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष काका ढोके यांनी केली आहे.

काका ढोके म्हणाले की, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना ही मदत वेळेत मिळाल्यास त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळू शकतो. शासनाने मदत जाहीर करून पात्र लाभार्थ्यांची यादीही तयार केली आहे. त्यामुळे आता रक्कम वितरित करण्यात कोणतीही दिरंगाई होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्व सर्कलमधील पात्र शेतकऱ्यांना गणेश चतुर्थीपूर्वी मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही ढोके यांनी केले. शासनाने जाहीर केलेली मदत वेळेत न मिळाल्यास शेतकऱ्यांच्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे कोणताही विलंब न करता मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.

यावेळी बागायतदार गणेश वाळके, अजय तेली यांच्यासह अन्य बागायतदार उपस्थित होते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​