Uncategorized

अवैध गर्भलिंग प्रकरणी 11 जणांना मोका

स्वप्निल पाटील टोळीतील म्होरक्यासह 11 जणांवर ही कारवाई झाली आहे

Kolhapur Moka Abortion कोल्हापूर : जिल्ह्यातील अवैध गर्भलिंग चाचणी आणि गर्भपात करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या स्वप्निल पाटील (एस.पी.) गँगवर महाराष्ट्रात पहिल्यांदाच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) अंतर्गत कारवाई केली आहे. स्वप्निल पाटील टोळीतील म्होरक्यासह 11 जणांवर ही कारवाई झाली आहे.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी या कारवाईस मंजुरी दिली. करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 1 जुलै 2026 रोजी भोगावती साखर कारखाना, शाहूनगर परिते येथील ब्लॉक नं. 5, रुम नं. 4 येथे स्थानिक गुन्हे शाखा आणि तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली होती.

याप्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात विविध कलमांर्तगत या टोळी विरोधात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी करवीरचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना या प्रकरणी सखोल चौकशी, कारवाईचे आदेश दिले होते. तपासात ही टोळी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने काम करत असल्याचे उघड झाले.

गर्भवतींना आकर्षित करणे, गर्भलिंग तपासणीसाठी ग्राहक मिळवणे, अवैधपणे सोनोग्राफी मशीन खरेदी, पेशंटच्या घरी जाऊन लिंग निदान आणि स्त्रीभ्रूण असल्यास अवैध गर्भपाताची व्यवस्था असे या टोळीचे काम चालायचे. गेल्या सात वर्षांत स्वप्निल पाटील टोळीविरुद्ध करवीरला 7, जुना राजवाडा पोलिसांत 1, राधानगरीला 2 आणि भुदरगडला 1 असे 11 गुन्हे दाखल आहेत.

या पार्श्वभूमीवर मोका प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून विशेष महानिरीक्षकांकडे पाठवला होता. त्याला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी मंगळवारी मंजुरी दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय अधिकारी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण, करवीरचे निरीक्षक रविंद्र कळमकर, सहाय्यक फौजदार राहुल देसाई, अंमलदार रणजीत पाटील, विजय तळसकर, महेश बांबळे, आत्माराम शिंदे, अमोल चव्हाण, सोमराज पाटील, अविनाश कांबळे, श्रीधर जाधव, प्रकाश कांबळे, प्रविण बोरचाटे यांच्या पथकाने केली.

टोळी विरोधात 11 गुन्हे सात वर्षांत (2020 ते 2026) या टोळीविरुद्ध करवीरला 7, जुना राजवाडाला 1, राधानगरीला 2 आणि भुदरगडला 1 असे 11 गुन्हे दाखल आहेत.

मोक्कातील आरोपी

  • स्वप्निल केरबा पाटील, (वय 35,
  • टोळीप्रमुख, बालिंगा, ता. करवीर),
  • महेश सुबराव पाटील (वय 35, शेती,
  • सिरसे, ता. राधानगरी, श्रीमंत तानाजी
  • पाटील, (वय 37, रा. पोल्ट्री, परिते),
  • विजय लक्ष्मण कोळसकर, (वय 39,
  • मडिलगे खुर्द, ता. भुदरगड), प्रशांत
  • वसंत जाधव (वैभवनगर, बेळगाव),
  • दत्तात्रय कृष्णा पाटील (सिरसे ता.
  • राधानगरी), ओंकार गोरखनाथ
  • कराळे (वय 30, रा. सडोली खालसा
  • ता. करवीर), सुनिल प्रकाश पाटील,
  • (वय 38, रा. सिरसे ता. राधानगरी),
  • अनिल प्रकाश टिपुगडे (वय 40,
  • भोगावती कॉलनी), शिवप्रसाद
  • सत्याप्पा महादेव पाटील, (वय 40,
  • रा. इचलकरंजी), अश्विनी गजानन
  • शिंदे, (वय 38, रा. कसबा वाळवे, राधानगरी)

अधिक कडक पावले उचलणार

“गर्भलिंग तपासणी आणि अवैध गर्भपाताच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी मोका अंतर्गत कारवाई केली जाईल. तसेच याप्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, अशी घोषणा विधानसभेत केली होती. त्यानंतर आता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली आहे. करवीर तालुक्यातील प्रकरणात मोका कायद्यांतर्गत झालेली कारवाई ही त्याच भूमिकेचा एक भाग आहे. पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायद्याच्या चौकटीत धडक कारवाई केली जाईल. गर्भातील मुलींच्या जीवाशी खेळणाऱ्यांना कोणतीही माफी नाही.”

  • प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्यमंत्री, महाराष्ट्र

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून पोलिसांचे अभिनंदन

बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपात करणाऱ्या 11 जणांच्या संघटित टोळीवर कोल्हापूर पोलिसांनी मोका अंतर्गत केलेल्या कारवाईचे विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्वागत केले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, पोलीस पथकाचे अभिनंदन केले. तसेच राज्यात अशाप्रकारे संघटित पद्धतीने गर्भलिंग निदान, अवैध गर्भपात करणाऱ्या टोळ्यांची माहिती संकलित करून आवश्यकतेनुसार मोकांतर्गत कठोर कारवाईचे हे मॉडेल राज्यभर प्रभावीपणे राबवावे, अशी अपेक्षा डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केली.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​