Uncategorized

माजगाव हरसावंतवाडा शाळेतील विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वितरण

ओटवणे प्रतिनिधी : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त माजगाव जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांच्यावतीने बुधवारी माजगाव हरसावंतवाडा प्राथमिक शाळा नं. ३ मधील विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मंजिरी शेंडे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना छत्र्या वितरण केल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांचे आभार मानले.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या वाढदिवसाच्या निमित्ताने माजगाव मतदार संघाचे जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांच्या कल्पकतेतून आणि पुढाकारातून गरजू विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी संजू परब यांना उदंड आयुष्यासाठी आणि पुढील राजकीय-सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, विद्यार्थ्यांच्या हिताचा हा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांचे कौतुक केले.
यावेळी माजगाव उपसरपंच रिचर्ड डिमेलो, माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संजय कानसे, ग्रामपंचायत ज्ञानेश्वर सावंत, गीता कासार, विशाखा जाधव, शिवसेना उपतालुका प्रमुख संजय माजगावकर, माजगाव शाखाप्रमुख रुपेश नाटेकर, भाजपा अध्यक्ष श्याम कासार, शाळेच्या मुख्याध्यापिका मंजिरी शेंडे, शिक्षिका साक्षी शेडगे, अंगणवाडी सेविका रश्मी मेस्त्री, प्रणिता सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आरोही बिडये, जान्हवी सावंत, प्रीती पांढरे, श्रीम. परीट आदी उपस्थित होते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​