Uncategorized

जगातील सर्वात शापित गाव

एका अशा गावाची कल्पना करून पाहता, जेथे कुणीच कधी सूर्यप्रकाश पाहिलेला नाही. येथे सूर्य उगवत नाही असे नाही, परंतु मेक्सिकोच्या ओआक्साका प्रांतात वसलेले टिल्टेपेक गाव तसेच आहे. येथे जन्माला येणारे प्रत्येक मूल आणि प्रत्येक प्राणी काही काळानंतर स्वत:ची दृष्टी गमावून बसते. हे रहस्य शतकांपासून चालत आले आहे आणि याला ‘व्हिलेज ऑफ ब्लाइंड’ देखील म्हटले जाते.

टिल्टेपेक गावात सुमारे 300-400 लोक राहतात. येथे नवजात मुले डोळे उघडून जन्माला येतात, परंतु काही दिवस किंवा आठवड्यांमध्ये त्यांची दृष्टी हळूहळू कमी होऊ लागते आणि अखेरीस पूर्णपणे जाते. हीच स्थिती गावातील श्वान, मांजर, पक्षी आणि अन्य प्राण्यांची देखील आहे. येथे कुठला तरी प्राचीन अभिशात असल्याचे स्थानिक लोक सांगतात. शतकांपूर्वी गावात एक खास वृक्ष होता, ज्याने कुणी हा वृक्ष पाहिला, तो अंध झाल्याची वदंता आहे. आजही अनेक लोक तो वृक्ष किंवा त्याच्या आसपासच्या जागेला समस्येचे कारण मानतात.

वैज्ञानिक तपासणी

मेक्सिको सरकार आणि वैज्ञानिकांच्या पथकाने तपासणी केली असता काही तथ्यं समोर आली. यात सर्वात प्रमुख कारण विषारी कीट असल्याचे म्हटले गेल. गावात असलेल्या काही विशेष प्रकारच्या माशांच्या संपर्कात आल्यास नेत्रदृष्टी जाऊ शकते. काही अध्ययनांमध्ये जेनेटिक कारणे देखील आढळून आली आहेत. दीर्घकाळापर्यंत छोट्या समुदायात विवाह झाल्याने रेसेसिव्ह जीन्स मजबूत झाले, ज्यामळे हेरिडिटेयरी ब्लाइंडनेस फैलावल्याचे म्हटले गेले. तर पर्यावरणीय घटक म्हणजेच पाण्यात रसायन, मातीचे प्रदूषण किंवा स्थानिक रोपं देखील याकरता जबाबदार असू शकतात.

गावात जीवन कसे चालते?

अंधत्वानंतरही ग्रामस्थ सामान्य जीवन जगतात. ते आवाज, स्पर्श, गंध आणि अन्य इंद्रियांचा वापर करत सर्वकाही करततात. मुले विशेष पद्धतीने शिक्षण प्राप्त करतात. घरांमध्ये खिडक्या कमी असतात, कारण प्रकाशाची गरज भासत नाही. सरकारने अनेकदा येथील ग्रामस्थांना इतर ठिकाणी वसविण्याचा प्रयत्न केला, परंतु ते स्वत:ची मातृभूमी सोडून जाऊ इच्छित नाहीत. नव्या ठिकाणी अनुकूल स्थिती नसल्याने अनेक लोक परतले आहेत.

अभिशाप विरुद्ध विज्ञान

संबंधित वृक्षाचा हा अभिशाप असल्याची ग्रामस्थांची मान्यता आहे, परंतु वैज्ञानिक याला निसर्गाची गडबड किंवा पर्यावरणीय समस्या मानत आहेत. हे प्रकरण हेरिडियरी ब्लाइंडनेस आणि पर्यावरण-आरोग्य संबंधी अध्ययनांसाठी महत्त्वपूर्ण आहे. हे गाव सोशल मीडिया, यूट्यूब डॉक्यूमेंट्री आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये वारंवार व्हायरल होत असते. लोक याला रहस्यमय मानून याविषयी जाणून घेऊ इच्छितात. अनेक पर्यटक येथे येण्याचा प्रयत्न करतात, परंतु तेथपर्यंत पोहोचणे अत्यंत अवघड आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​