प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर अरविंद खानोलकर यांचे निधन

सावंतवाडी प्रतिनिधी : सावंतवाडी येथील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. अरविंद दत्तात्रय खानोलकर ( ८२) यांचे सोमवारी येथील खासगी रुग्णालयात अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी सावंतवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
डॉ. खानोलकर हे निष्णात बालरोगतज्ञ असल्याने सिंधुदुर्ग जिल्हाभरातून त्यांच्याकडे रुग्ण तपासणीसाठी येत असत.
डॉ. अरविंद खानोलकर हे मूळचे मळगाव येथील. त्यांचे वडील वडील डॉ. द. भि. खानोलकर १९४२ पासून बांदा येथे रुग्णसेवा द्यायचे. त्या काळात डॉक्टर पत्नी सोबत त्यांनी बांदा येथे सुतिकागृह सुरू करून सेवा दिली. केवळ एक रुपयात ते रुग्ण तपासायचे. हाच सेवेचा वसा डॉ. अरविंद यांनी पुढे चालविला. ते देखील सावंतवाडी येथे अल्प दरात सेवा द्यायचे. त्यांच्या हाताला गुण असल्याने दूरवरून अनेक पेशंट त्यांच्याकडे यायचे. डॉक्टर अरविंद यांच्या भगिनी डॉ. उषा खानोलकर या देखील रुग्णसेवेत होत्या. डॉ. अरविंद हे शिस्तप्रिय होते. मात्र, तेवढेच प्रेमळही होते. अनेक शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्थांना त्यांनी सढळ हस्ते मदत केली. मात्र, त्याची कधीही प्रसिद्धी केली नाही. अलीकडच्या काळापर्यंत ते रुग्णसेवा करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सावंतवाडी येथील बालरोगतज्ञ डॉ. मिलिंद खानोलकर, अभियंता अभिजीत यांचे ते वडील होत.
Source link



