Uncategorized

शिंदे शिवसेनेची नव्या पोलीस अधिकाऱ्यांशी भेट

सावंतवाडी, प्रतिनिधी : सावंतवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी नुकताच पदभार स्वीकारल्यानंतर शिंदे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी सावंतवाडी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच आंबोली घाटातील वाहतूक व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत यांनी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था आणि वाहतूक व्यवस्थेबाबत निश्चितच आवश्यक ती दखल घेतली जाईल, असे आश्वासन दिले. तर पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पोलीस कुमक वाढविण्याची आवश्यकता असून, त्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.

यावेळी शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख नारायण राणे, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी तसेच शहरप्रमुख व नगरसेवक बाबू कुडतरकर यांच्या हस्ते दोन्ही अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या प्रसंगी पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा, पंचायत समिती सदस्य प्रणाली टिळवे, गजानन नाटेकर, संजय पालकर, विश्वास घाग, एकनाथ हळदणकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीदरम्यान पंचायत समिती सदस्य मायकल डिसोजा आणि तालुकाप्रमुख नारायण राणे यांनी विशेषतः आंबोली घाटातील वाहतूक कोंडी, पर्यटकांची वाढती संख्या आणि वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा यासंदर्भात अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​