एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर श्रद्धा सावंत-भोसले यांची निवड

सावंतवाडी | प्रतिनिधी : जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीवर सदस्य म्हणून सावंतवाडी नगराध्यक्ष श्रद्धा सावंत-भोसले यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिले आहे. या समितीचे अध्यक्ष पालकमंत्री नितेश राणे आहेत. शासनाच्या वतीने ही जिल्हास्तरीय आरोग्यवर्धिनी समिती गठित करण्यात येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागांतील आरोग्यविषयक समस्या व अडचणी या समितीच्या माध्यमातून मांडून त्यावर उपाययोजना करण्याची संधी मिळते.
सावंतवाडी शहरातील आरोग्यविषयक समस्या प्रभावीपणे मांडण्याच्या दृष्टीने नगराध्यक्ष श्रद्धा सावंत-भोसले यांची समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या शिफारशीनुसार ही निवड झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या निवडीमुळे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा उंचावणे तसेच मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रलंबित प्रश्नावर सातत्याने चर्चा होऊन तो मार्गी लावण्यासाठी प्रयत्न होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Source link



