बांदा श्री विठ्ठल मंदिरात वीणा सप्ताहास आरंभ

बांदा / प्रतिनिधी : बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात प्रतिवर्षावप्रमाणे यंदाही हरिनाम वीणा सप्ताहाला शुक्रवारी मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात आरंभ झाला.सप्ताहाचे पारप्रमुख,सेवेकरी व भाविकांच्या उपस्थितीत या सोहळ्याची सुरुवात झाली. सर्वप्रथम वीणा,समई व तबला,पेटी,टाऴ ,मृदुंग आदी सर्व भजन साहित्य श्री विठ्ठल रखुमाई चरणी ठेवण्यात आले. त्यानंतर वीणा व सर्व साहित्याचे पुजन करून गाऱ्हाणे घालण्यात आले.ठिक १२ वाजता पहिला पार आळवाडाचे पारप्रमुख विनीत पडते यांच्याकडे वीणा देण्यात आला व नामाच्या गजरात तीन प्रदक्षिणा करुन सप्ताहाची सुरुवात झाली. यावेळी भजन व आरती करुन प्रसाद वाटण्यात आला.
या सप्ताहानिमित्त मंदिरात सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि.२४ जुलै रोजी सप्ताहाची सांगता होणार असून शनिवार दि. २५ जुलै रोजी आषाढी एकादशीचा भव्य सोहळा होणार आहे. सप्ताहानिमित्त दररोज नामस्मरण, भजन, गजर, सायंआरती तसेच सायंकाळी ५ ते ६.३० स्थानिक महिलांची भजनसेवा व रात्री १० ते १२ या वेळेत स्थानिक नित्य भजनकर्मींची भजनसेवा होईल.
Source link



