Uncategorized
किल्ले राजकोट येथे स्वच्छता मोहीम

मालवण | प्रतिनिधी : लायन्स क्लब मालवण आणि मालवण नगरपरिषद आरोग्य व स्वच्छता विभाग यांच्या वतीने सामाजिक उपक्रमांतर्गत किल्ले राजकोट येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. लायन्स क्लब मालवण अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, सेक्रेटरी पुनम चव्हाण, खजिनदार राधिका मोंडकर, जयश्री हडकर, रूपा कांदळगांवकर, बाबल कवठकर, नगरपरिषद मुकादम आनंद वळंजु, बाळकृष्ण जाधव यांसह नगरपरिषद कर्मचारी या स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. संपूर्ण परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
लायन्स क्लब मालवण यांच्या वतीने सातत्याने विविध सामाजिक व सेवाभावी उपक्रम राबवण्यात येतात. या उपक्रमांतर्गत लायन्स क्लबच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
Source link



