Uncategorized

Sunil Tatkare | NCP अजित पवार गटात खरंच नाराजी? सुनील तटकरेंनी दिलं स्पष्ट उत्तर,म्हणाले…

 मुंबई –  गेल्या बऱ्याच दिवसांपासुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटांमध्ये काही ठीक नसल्याचे बोललं जात होत… राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदी सुनेत्रा पवार झाल्यामुळ पक्षात नाराजीचे सुर उमटत होते.. नुकताच शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेले असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या यावर आता सुनील तटकरे यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेदांच्या चर्चांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पूर्णविराम दिला आहे. पक्षात कोणत्याही प्रकारचा गैरसमज किंवा अविश्वास नसल्याचं स्पष्ट करत, सध्या सुरू असलेल्या राजकीय चर्चा चुकीच्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील आणि आपली भेट झाल्याच्या चर्चांवरही सुनील तटकरेंनी स्पष्टीकरण दिलं. जयंत पाटील यांच्यासोबत आपली कोणतीही भेट झालेली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अविश्वासाचं वातावरण असल्याचं आपण कधीही ऐकलं नाही, असंही तटकरे म्हणाले.

दरम्यान, अजित पवार हयात असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत चर्चा झाल्या होत्या. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर या चर्चांना आता पूर्णविराम मिळाल्याचं सुनील तटकरे यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटींवरून सुरू असलेल्या चर्चांवरही तटकरे यांनी भाष्य केलं. आपण खासदार असून मतदारसंघातील कामांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणं स्वाभाविक आहे. प्रत्येक भेट ही राजकीय कारणासाठीच असते, असं नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​