Ketan Agrawal Murder Case | ‘माझ्या मुलाला न्याय द्या’… केतन अग्रवालच्या आईची पंतप्रधान मोदींकडे आर्त हाक

पुणे – गेल्या बऱ्याच दिवसांपासुन बहूचर्चीत असलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरण रोज कोणतेना कोणते धक्कादायक वळण घेत आहे..पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याची 400 फूट लोहगडावरुन धक्का देऊन हत्या करण्यात आली. याच प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी याची पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरु असतानाच आता केतन अग्रवाल याच्या आईने एक धक्कादायक पाऊल उचलेले आहे.. केतनच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाविनिक पत्र लिहिलं आहे.
केतनच्या आईने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित त्यांना न्यायची मागणी केली आहे.. त्यांनी पत्रात असं म्हणलंय की, “प्रत्येक आईप्रमाणे, मी स्वप्न पाहिले होते की केतन एक सुंदर आयुष्य घडवेल, लग्न करेल आणि आमच्या म्हातारपणात साथ देईल” पत्रात पुढे त्या म्हणाल्या. “पण त्याऐवजी, मला माझ्या मुलावर अंत्यसंस्कार करावे लागले. माझ्या मुलाची निर्घृणपणे हत्या झाली आणि त्याच्यासोबत माझे संपूर्ण जग उद्ध्वस्त झाले. आमच्या घराचा प्रत्येक कोपरा मला त्याची आठवण करून देतो. त्याची खोली, त्याचे कपडे, त्याचे फोटो मला दररोज आठवण करून देतात की तो कधीही परत येणार नाही. मात्र मी जेव्हा त्यांच्या फोटो समोर उभी राहते तेव्हा मला असं वाटतं की त्याची आई त्याचासाठी लढा देत आहे. मला वाटतंय की एका दिवशी मी त्याला सांगेन की मी तुला न्याय मिळवून दिला” या पत्राबाबत सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे.केतन अग्रवाल हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
Source link



