Uncategorized

Mobile recharges without data are now likely to become cheaper.

ट्रायकडून मसूदा सादर, सूचना मागविल्या : 70 टक्क्यांपर्यंत सवलत मिळण्याची शक्यता

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

आता डेटाशिवाय मोबाईल रिचार्ज प्लॅन्स स्वस्त होऊ शकतात. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) यावर काम करत आहे. ट्रायने ‘दूरसंचार ग्राहक संरक्षण नियम, 2026“ चा नवीन मसुदा प्रसिद्ध केला आहे. याचा मुख्य उद्देश आहे ‘डेटा न वापरता त्याचा पैसा का द्यायचा?“ ट्रायने या प्रकरणी सर्व प्रकारच्या सूचना मागवल्या आहेत, त्यानंतर याला अंतिम स्वरूप दिले जाईल.

किमती किती कमी असतील?

मोबाईल प्लॅनच्या खर्चापैकी 50-70 टक्के खर्च डेटावर होत असल्याने, नवीन नियम लागू झाल्यावर केवळ कॉल-एसएमएस असलेल्या प्लॅनची किंमत आणखी कमी होऊ शकते. उदाहरणार्थ, 300 रुपयांचा प्लॅन 100 ते 150 रुपयांना मिळू शकेल. डेटा न वापरणाऱ्या फीचर फोन वापरकर्त्यांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी. जे दुसरे सिम फक्त कॉल्ससाठी ठेवतात. याशिवाय, ज्यांच्या घरी वायफाय आहे, त्यांच्यासाठीही हे फायदेशीर ठरेल.

अत्यावश्यक कॉल्स ब्लॉक करू शकणार नाहीत

1600 सिरीज: ही बँका, वित्तीय संस्था (आरबीआय, सेबी इत्यादी) आणि सरकारी कामांसाठी आहे, जेणेकरून नागरिक अत्यावश्यक व्यवहारांशी संबंधित कोणतेही कॉल्स ओळखू शकतील.

140 सिरीज: ही कंपन्यांच्या जाहिरात कॉल्ससाठी आहे. ग्राहक डीएनडी सेवेद्वारे ते स्वत: ब्लॉक करू शकतात. कंपन्यांना नवीन नियम लागू करण्यासाठी वेळ मिळेल. अंतिम किंमत दूरसंचार कंपन्यांकडून ठरवली जाईल. नियम बनवल्यानंतर, कंपन्यांना ते लागू करण्यासाठी वेळ दिला जाईल. यामुळे दूरसंचार कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढेल, परिणामी वापरकर्त्यांना स्वस्त पर्याय उपलब्ध होतील.

सरकारला लक्ष का द्यावे लागले?

या मसुद्यातून हे स्पष्ट झाले की, ग्राहकांना योग्य रिचार्ज पर्याय मिळत नव्हता, त्यामुळे सरकार आणि नियामकाला हस्तक्षेप करावा लागला. सध्या कंपन्या ग्राहकांना दीर्घकालीन आणि महागड्या योजना खरेदी करण्यास भाग पाडतात.

परंतु नवीन नियम लागू झाल्यानंतर, वृद्ध आणि ग्रामीण भागातील ग्राहकांवरील आर्थिक भार संपुष्टात येऊ शकतो. या नियमाच्या अंमलबजावणीनंतर 6 महिन्यांनी ट्राय कंपन्यांच्या कामगिरीचा आढावा देखील घेईल.

नवीन प्रस्ताव काय आहे?

सध्या कंपन्या मर्यादित कालावधीसाठी हे ‘फक्त कॉल-एसएमएस“ पॅक देत आहेत. यामुळे अनेक ग्राहकांना महागडे डेटा प्लॅन्स घेण्यास भाग पडत आहे. आता ट्रायने असा प्रस्ताव दिला आहे की, 7, 28, 56 किंवा 84 दिवसांच्या वैधतेच्या डेटा प्लॅनसाठी कंपन्यांना या कालावधीकरिता ‘फक्त कॉल आणि एसएमएस“ प्लॅन देखील सादर करावा लागेल.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​