Uncategorized

घडतंय बिघडतंय

केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलाच्या चर्चेनंतर आता राज्यात नेतफत्व बदलाच्या चर्चेला उधाण आले आहे. राज्यात कोणतीही निवडणूक नसतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही दिवसात घेतलेल्या धडाकेबाज निर्णयाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा पेंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होऊन त्यांच्या जागी नवा मुख्यमंत्री येण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

ऑपरेशन टायगर -2 नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील अशी चर्चा असतानाच, आता भाजपचे नेते राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची सुध्दा मुख्यमंत्री पदासाठी चर्चा सुरू झाली आहे. बावनकुळे ओबीसी समाजाचे आहेत, दोन उपमुख्यमंत्री मराठा समाजाचे आणि मुख्यमंत्री ओबीसी असा, सत्तेचा समतोल साधण्याचा प्रयत्न आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला 20 जुलैपासून सुऊवात होत आहे. अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात खांदेपालट होऊन नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाण्याची दाट शक्यता आहे.

2022 नंतरचे राजकारण बघता महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाकडे पाशवी बहुमत असताना देखील, सतत राजकीय भूकंपाच्या चर्चा होताना दिसतात. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांनी जोर धरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पेंद्रात महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार असून त्यांच्या जागी कोण येणार हा महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठा प्रश्न आहे. एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर-2 केल्यानंतर शिंदेंची मुख्यमंत्री म्हणून कमबॅक होणार ही चर्चा सुरू झाली. मात्र आता अचानक शिंदेंचे नाव मागे पडून भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंचे नाव पुढे आले आहे. त्यामुळे राज्यातील नेतृत्व बदलांच्या चर्चांना पृष्टी मिळत आहे. नीट परीक्षेच्या पेपर फुटीमुळे पेंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. पेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना बदलले जाणार असल्याचीही चर्चा आहे. इथेनॉल संबंधित धोरणामुळे पेंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचे मंत्रिपद अडचणीत आहे. फडणवीस हे भाजपच्या महत्त्वाच्या चेहऱ्यांपैकी एक मानले जातात. संघटन, प्रशासन आणि निवडणूक व्यवस्थापनातील त्यांच्या अनुभवाचा उपयोग दिल्लीतील डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता फडणवीस दिल्लीत गेल्यास त्यांच्या जागी कोण यावऊन सध्या राज्यात राजकीय चर्चा, शक्यता व तर्कवितर्कांना उधाण आले आहे. शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी देवाभाऊंनी दिल्लीत नेतृत्व करावे आणि राज्यात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे अशी मागणी केली आहे. राज्यातील आमदारांचे संख्याबळ पाहिल्यास भाजप हा राज्यात मोठा पक्ष आहे. मात्र 2022 ला भाजपने मनाचा मोठेपणा, मनावर दगड ठेऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले. आता शिवसेनेला पुन्हा एकदा भाजपने मनावर दगड ठेवावा असे वाटत आहे, मात्र त्यावेळची परिस्थिती वेगळी होती.

उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पाडणे हे भाजपचे टार्गेट होते, शिंदे यांनी  सरकार पाडण्याची मोहीम यशस्वी केल्याने त्यांना मुख्यमंत्रीपदाचे इनाम देण्यात आले होते. आता मात्र परिस्थिती तीच राहिलेली नाही, मात्र मुख्यमंत्री पदावर राहिल्याने शिंदेंना या पदाचे महत्त्व समजले आहे. शिंदेंची राजकीय महत्वकांक्षा मोठी आहे, मुख्यमंत्री पदासाठी कोणतीही तडजोड करू शकतात. ऑपरेशन टायगर-2 हा त्याचाच भाग असल्याचे बोलले जाते. राज्यातील भाजपा ही एकसंधपणे देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी ठाम असल्याचे सध्या तरी दिसत आहे. त्यामुळे फडणवीसांच्या मर्जीशिवाय कोणालाही दिल्लीतील श्रेष्ठी टिळा लावणार नाही, एकनाथ शिंदे यांना संधी दिल्यास शिंदेंचा वारू असा चौखुर उधळेल की भाजपला भविष्यात तो रोखणे कठीण होईल याची जाणीव फडणवीसांना आहे. दोन-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून लाडका भाऊ म्हणून जनतेच्या मनात जे स्थान निर्माण केले. त्या तुलनेत फडणवीसांना मुख्यमंत्री होऊन दोन वर्षे होत आली तरी ती लोकप्रियता मिळताना दिसत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री केल्यास शिंदे हे फडणवीसांसाठी नाही तर भाजपसाठीच डोकेदुखी ठरू शकतात. ज्या उध्दव ठाकरेंनी 2019 ला भाजपला सत्तेपासून दूर ठेवत महाविकास आघाडीचा नवा प्रयोग केला, त्यावेळी ठाकरे यांनी अमित शाहांना खलनायक ठरवले होते, शाह यांनी दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे शाह यांचे शिवसेना आणि ठाकरे हे टार्गेट राहिले आहेत, ठाकरे आणि शिवसेना संपवणाऱ्या शिंदेंना शाह यांनीच बळ दिले.

आता सहा खासदारांना फोडून शिंदेंनी आपली पुन्हा एकदा राजकीय ताकद दाखवून दिल्याने, अमित शाह यांचा मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांच्या नावाला समर्थन असल्याचे बोलले जात आहे. तर तिकडे उध्दव ठाकरे यांच्याकडून म्हणजेच संजय राऊत यांनीच बावनकुळे यांचे नाव चर्चेत आणले. जवळपास 30 वर्षानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाच्या बैठकीसाठी विधानभवनात आलेल्या शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाला भेट दिली. फडणवीसांचे पक्षातील महत्त्व कमी केले जात आहे, हे पवारांना कळत असल्यानेच त्यांनी शिंदे यांच्या कार्यालयाला भेट देताना भाजपच्या वरिष्ठांना योग्य ते संकेत दिले. ज्या फडणवीसांनी पवारांच्या महाराष्ट्रातील मोनोपोलीच्या राजकारणाला सुरूंग लावला, त्यांना दिल्लीत पाठवण्यासाठी पवार हे महाविकास आघाडीतील शिवसेनेला बाजुला सारत शिंदेंच्या पाठीशी उभे राहु शकतात. पवारांकडे 8 खासदार आहेत, ते केव्हाही शाह यांच्या पाठीशी उभे करू शकतात, शेवटी राजकारणात दुश्मन का दुश्मन वो अपना दोस्त इतकेच बघतात. राज्यात अतिवृष्टीमुळे सर्व सामान्यांना झालेला त्रास, मुंबई-पुणे मिसिंग लिंक रोडची झालेली दुर्दशा, या घटनांवऊन विरोधकांनी महाराष्ट्राचे इफ्रामॅन फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून लक्ष्य केले. फडणवीसांनी सभागृहाबाहेर त्यांच्यावर केलेल्या टिकेला विधानसभेत उत्तर देणे हे चुकीचे, त्यात जी भाषा वापरली त्यावऊन फडणवीस हे कधी नव्हे ते हतबल असल्याचे पहायला मिळाले. आगामी पेंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होईपर्यंत नेतृत्वबदलाची आणि संभाव्य नावाची चर्चा कायम राहणार आहे. 25 जुलैला आषाढी एकादशी आहे, आषाढी एकादशीच्या शासकीय पुजेचा बहुमान मिळणे म्हणजेच पांडुरंगाची कृपा असणे होय, त्यामुळे कोणाच्याही नावाची किती ही चर्चा झाली तरी पांडुरंगच ठरवेल कोणाला मान द्यायचा…

प्रवीण काळे

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​