Uncategorized

पुढील सूचना मिळेपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी बंद

इराणच्या सूचनेनंतर जहाजांच्या वाहतुकीवर परिणाम

वृत्तसंस्था/ तेहरान

इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याची घोषणा केली आहे. कोणत्याही जहाजाने त्यांच्या परवानगीशिवाय ही सामुद्रधुनी ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असा कडक इशारा इराणने दिला आहे. इराणने दिलेल्या या इशाऱ्यानंतर तेल आणि वायू वाहतूक करणाऱ्या जहाजांच्या वाहतुकीवर विपरित परिणाम झालेला दिसत आहे. दरम्यान, युद्धविराम संपल्यापासून अमेरिकेने इराणवर हवाई हल्ल्यांची तिसरी फेरी सुरू केली आहे. यापूर्वी बुधवारी आणि गुरुवारीही हवाई हल्ले करण्यात आले होते.

इराणी सैन्याने होर्मुझमध्ये सायप्रसचा ध्वज असलेल्या एका मालवाहू जहाजावर हल्ला केला होता, असे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (सेंटकॉम) सांगितले. यापूर्वी, इराणचे नवीन सर्वोच्च नेते, मोजतबा खामेनी यांनी त्यांचे वडील, अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधीनंतर आपला पहिला संदेश जारी केला. ‘मी माझ्या वडिलांच्या मृत्यूचा आणि निष्पाप नागरिकांच्या रक्ताचा निश्चितपणे बदला घेईन, ही आमच्या देशाचीही इच्छा आहे.’ असे मोजतबा खामेनी यांनी म्हटले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​