Uncategorized

Moshi Building Collapse | मोशीत कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला; १५ जण अडकल्याची भीती

पुणे – गेल्या काही तासांत झालेल्या धुवांधार पावसानं पुण्यात अक्षश: रुद्ररूप धारण केलंय.. याचा फटका पिंपरी चिंचवडला देखाील बसल्याचे समोर येत आहे.. पिंपरी चिंचवडला एक मोठी दुर्घटना घडली आहे.. मोशी कचरा डेपोला लागून ही इमारत आहे. अतिवृष्टीमुळे हा कचऱ्याच्या डोंगर इमारतीवर आला.

त्यामुळं ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या ढिगाऱ्याखाली सुमारे १४ ते १५ जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे…घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

दुसरीकडे, . पिंपरी-चिंचवड औद्योगिक पट्ट्यासह निवासी भागांतही पावसाची संततधार सुरू असल्याने नागरिकांना आणि नोकरदारांना प्रवासादरम्यान मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणांतील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. तसेच पवना आणि इंद्रायणी नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ नोंदवली जात असून, नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​