Ritu Tawde “मी रीलस्टार आहे की रियल स्टार ते मुंबईकर ठरवतील” महापौर रितू तावडे कुर्ला दुर्घटनेवरुन भडकल्या

मुंबईत झाड कोसळून वृद्धाच्या झालेल्या मृत्यूनंतर आता वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी या घटनेनंतर संतापून मागील २५ वर्षांचा इतिहास काढू असा इशाराच दिला आहे. मान्सूनच्या जोरदार आगमनानंतर मुंबईत दोन दुर्घटना घडल्या. एका घटनेत स्कूलबसवर झाड कोसळून ११ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत मॅनहोलमध्ये पडून एका ५० वर्षीय इसमाचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या दोन घटना ताज्या असताना
कुर्ल्यात झाड कोसळून मृत्यू
दरम्यान मुंबईतील कुर्ला कमानी परिसरात झाडं कोसळून एका ६५ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेची चौकशी करण्यासाठी महापौर रितू तावडे कुर्ला येथे दाखल झाल्या . ही घटना दुर्दैवी आहे या बाबत चौकशी केली जाईल. यावेळी आरोप करणाऱ्या विरोधकांना रितू तावडे यांनी संताप व्यक्त करत राजकारण न करण्याचा सल्ला दिला.
या भेटीदरम्यान रितू तावडे म्हणाल्या “हे झाड धोकादायक स्थितीत होते. मात्र अशा घटनांमागे कॉन्ट्रॅक्टर्सना महापालिका प्रशासन किंवा सत्ताधारी पाठीशी घातले जात असल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात आहे. असे वक्तव्य करत मुंबईकरांची दिशाभूल केली जात आहे. अशाठिकाणी राजकारण करून काही नाही होणार. आरोप करणं बंद करा आणि कामं करण्यास सुरुवात करा”
पुढे बोलताना बोलताना म्हणाल्या “मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. हायटाईडचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी झाडं किंवा घरांचे छप्पर, पत्रे कोसळण्याच्या घटना घडत आहेत. मात्र या घटनांवर विरोधकांकडून वेगळं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केले जात आहे. उबाठा आणि मनसेकडून केवळ आरोप केले जात आहेत. सगळ्याचं ऑडिट झालं पहिजे. पण राजकारण नको. ठाकरे गट आणि मनसेचा सुरु असलेल्या या घाणेरडा प्रकाराचा निषेध करते”
किशोरी पेडणेकर माजी महापौर आहेत. त्यांना पालिकेचे सभाशास्त्र माहित असणे गरजेचे आहे. एखादं पत्र दिल्यानंतर तीन दिवस आपल्याला एमएस डिपार्टमेंटला द्यावे लागतात. त्यांनतर आपण विशेष सभा घेतली जाते. मात्र या गोष्टीचे नियम, निकष माहित असूनही केवळ गलिच्छ प्रकारचे राजकारण किशोरी ताई, सुषमा अंधारे आणि इतर लोकांनी सुरू केले आहे. मी बाहेर पडल्यावर मला रिलस्टार म्हटले जाते. आमदार, महापौर, नगरसेवक काय करत आहेत, कुठे आहेत, ते कोणतं काम करतायत, हे सर्व आम्हाला मुंबईकरांना दाखवावं लागतं. पण मी रिलस्टार आहे की रियल स्टार ते मुंबईकरच ठरवतील. तुम्ही तुमच्या दिव्याखाली काय अंधार झाला आहे ते पहा, अशी थेट टीका रितू तावडे यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या टीका सुषमा अंधारे यांच्यावर केली.
Source link



