Uncategorized

सांगली अलर्ट! शिराळ्यात ढगफुटीसदृश पाऊस, पूल पाण्याखाली

सांगली -जिल्ल्यात सलग तिसऱ्या विबशी पावसाने हजेरी लावली. सांगली मिरजेसह जिल्हाभर कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. शिराळा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून बाळबा तालुक्यातील काही मंडलातही अतिवृष्टी झाली आहे. पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे कोयना धरणातील पाणीसाठा चोवीस तासात तीन तर बारणा धरणातील पाणीसाठा जबलपास एक टीएमसीने वाढला आहे.

पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधारेमुळे जिल्हयाच्या संभाव्य पाणी टंचाईची समस्या सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर जिल्हाभर सुरू असलेल्या पावसामुळे आता पेरण्या खोळंबलेल्या बळीराजाची धावपळ सुरू झाली आहे. शेतीची मशागत झाली. पण जून महिना कोरडाच गेल्याने पेरण्या खोळंबल्याहोत्या. अशातच हवामान तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांनी अल निनोच्या प्रभावाची भिती घातल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. परंतु दोन तीन दिवसापासून सुरू झालेल्या पावसाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

गेल्या चोवीस तासात जिल्हयात २७.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. परंतु शिराळा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. शिराळा तालुक्यात सरासरी ८३.६ मिमी पाऊस झाला आहे. कोकरूड आणि चरणमध्ये तर ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. चरणमध्ये १०१ आणि कोकरूडमध्ये ९५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय शिराळा मंडलात ६९ मिमी, शिरशी मंडलात ७२ मिमी, मांगले मंडलात ८२, सागाव मंडलात ८१ मिमी पाऊस झाला आहे.

वाळवा तालुक्यात सरासरी ४८.३ मिमी पाऊस झाला आहे. या तालुक्यात कोरेगाव ६६.८, कुरळप ६६.५, तांदुळवाडी ६६.८ आणि चिकुर्डे मंडलात ६६.५ मिमी पाऊस झाला आहे. अन्य मंडलातही पावसाने जोरदार बॅटींग केली आहे. जोरदार पावसामुळे पश्चिम भागातील ओढे आणि नाले दुतर्फा भरून वाहू लागले आहेत. मांगले सावर्डे पुलावरशनिवारी दुपारी पाणी आल्याने हा पुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. याशिवाय तासगाव तालुक्यात सरासरी १७ मिमी पाऊस झाला आहे.

आटपाडी तालुक्यात५.३, कवठेमहांकाळमध्ये ९.७, पलूस तालुक्यात २८.२ मिमी आणि कडेगाव तालुक्यात ४४.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

या तालुक्यात शाळगाव, कडेगाव आणि चिंचणी मंडलात जोरदार पाऊस झाला आहे. मिरज तालुक्यात सर्वत्र १८.५, जत तालुक्यात २.९ आणि खानापूर तालुक्यात १९.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वत्र पावसाचे वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

वारणा धरणात १२. ८८ टी. एम. सी.पाणीसाठा

जिल्ह्यातील वारणा धरणात शनिवारीसायंकाळपर्यंत १२.८८ टी.एम.सी पाणीसाठा झाला आहे. शुक्रवारी या धरणात ११.९७टीएमसी साठा होता. तर कोयना धरणातील साठ्यात चोवीस तासात तीन टी.एम.सीने वाढ होऊन ११.१२ टी.एम.सी साठा झाला आहे.विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना १९.१२ (१०५.२५), धोम ४.०९ (१३.५०), कन्हेर ३.७० (१०.१०), धोम बलकवडी ०.९६ (४.०८),उरमोडी ३.२९ (९.९७), तारळी ०.७७(५.८५), वारणा १२.८८ (३४.४०), राधानगरी २.६३ (८.३६), दूधगंगा २.६५ (२५.४०), तुळशी १.३७ (३.४७), कासारी ०.८७ (२.७७), पाटगांव १.२१ (३.७२), अलमट्टी २०.६९ (१२३).

शिराळा तालुक्यात ८ ३.६ मि. मी.पावसाची नोंद

जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी २७.५ मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक ८३.६ मि. मी.
पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात पडलेला पाऊस व कंसात १ जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज १८.५ (१०५.७), जत २.९ (११७), खानापूर १९.३ (१४७.२), वाळवा ४८.३ (१६७), तासगाव १७(१४६.७), शिराळा ८३.६ (२६४.७), आटपाडी ५.३ (१३८.६), कवठेमहांकाळ ९.७ (७३.७), पलूस २२.९ (११०), कडेगाव ३३.७ (१०१.८).

 

 

 

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​